💥मंगरूळपीर येथे तलवार जप्त,मंगरुळपीर डिबी पथकाने कारवाई करत आरोपीलाही केली अटक...!


💥आरोपी प्रवीण उर्फ सोनू रामलाल पेन्ढारकर याच्या विरोधात गुन्हा दाखल💥 

वाशिम :- मंगरूळपीर शहर पो.स्टे हद्दीत शहरातील मंगलधाम भागात एका इसमाच्या घरी विनापरवाना तलवार ठेवली असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक लोखंडी तलवार आढळुन आली.

याप्रकरणी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नसल्याने सदर तलवार जप्त करून आरोपी प्रवीण उर्फ सोनू रामलाल पेन्ढारकर वय 49 वर्ष मंगलधाम याच्या विरूध्द कलम 4 व 25 हत्यार कायदा 1959 सह व 135 मपोका प्रमाणे कारवाई करून आरोपीला अटक केली. ही कारवाई 28 जून ला ऊपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे आणी ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गदर्शनात सह पु. निरीक्षक जाधव,पोलिस कर्मचारी अमोल मूंदे,मुहम्मद परसूवाले, सचिन शिंदे व कविता गाडगे यांनी केली. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या