💥स्वर्गीय राधाबाई मुसळे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय लिंबाळा मुक्ता येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार....!


💥विद्यालयातून सुजल सरनायक व अभिमन्यू पाटील प्रथम💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली

               महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गत आठवड्यात दिनांक आठ जूनला इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला या निकालाची कॉलेज परत  दिनांक 17 रोजी कॉलेजला प्राप्त झाल्यानंतर यामधील प्रथम व द्वितीय गुना क्रमांकानुसार करून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

        हिंगोली शहरालगत असलेल्या लिंबाळा मक्ता येथील स्वर्गीय राधाबाई मुसळे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी हनुकताच इयत्ता 12 वीचा निकालनुकताच जाहीर  आला, त्यात स्व. राधाताई मुसळे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्याल लिंबाल (मकता) ता. जि. हिंगोली मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले . त्यामध्ये सुजल गोपालराव सरनायक ,यश अभिमन्यू पाटील या दोघांनीही  93 % घेत महाविद्यालयातून सर्वप्रथम आले आहेत. ईतर विद्याथ्यामध्ये बडजाते अचल सुनिल 91.17% , नेणवाणी वंश ओमप्रकाश, 91.17 ,पाईकराव सुमिन सुरेशराव 90.33%, बांगर ऋत्विक रामदास 90.7 , लिंबाळकर गायत्री सुमित 90%, सोनी लब्धी शैलेस 90%, गुठे सुदर्शन जीतेंद्र 89% ,देशमुख ऋतुराज गजानन 89%, हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याच बरोबर SHE शिष्यवृत्ती साठी 12 विद्याची पात्र झाले. त्याचबरोबर सर्वच विद्यार्थी चांगुल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्याच सत्कार संस्थाध्यक्ष तथा प्राचार्य श्री. पंजाबराव  गव्हाणकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. कासराळीकर, प्रा. जाधव, प्रा. चौधरी, प्रा.सौ. कदम, विकास घुगे, शिवम गव्हाणकर, सागर वैदय आदीची उपस्थित होते तसेच विज्ञान,वाणिज्य या शाखेचा 100% तर कल शाखेचा 98% निकाल लागला असून त्यात 57 विद्यार्थी विशेष प्राविन्यासह  तर 565 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 3 डिस्टेंसन मध्ये आले आहेत. 

त्याच प्रमाणे विवेकानंद ज्ञानपिठ प्राथमिक.व मा. विदयालया लिंबाळा चा 100% निकाल असुन त्यात 7 विद्यार्थी विशेष प्राविन्या सह व उर्वरीत विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यात केंद्रे पलक पंडित -92% ही विदयार्थीनी सर्व प्रथम आली असून तीचे अभिनंदन व सत्कार प्राचार्य पंजाबराव गव्हाणकर यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेच्यावतीने सर्व गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. स्व. राधाताई मुसळे कनिष्ठ.महाविद्यालय लिंबाळ/मकता) विवेकानंद ज्ञानपिठ प्रा.व भा, विदयालय विवेकानद ज्ञानपिठ ज्यु. कॉलेज आदीचे कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या