💥जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा ग्रामपंचायत विकास कामे बोगस....!


💥सरपंचांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील सरपंचाने मनमानी कारभार चालवला असून गावातील विकास कामे बोगस करण्याचा सपाटा लावला आहे म्हणून सरपंचाचा कारभाराची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांने दि. २० जून रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

        ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावे यासाठी शासनाच्या विविध विकास योजना ग्रापंचयातच्या माध्यमातून राबवण्यात येत असतात यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, रस्ते आदी कामे करण्यात येत असतात यासाठी लाखोंचा निधी खर्च करण्यात येतो असतो मात्र ग्रामीण भागातील काही सरपंच कुणाही न जुमानता आलेला विकास निधी बोगस कामे करून आपले उखळ पांढरे करून घेत असतात असाच प्रकार जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील सरपंचाने चालवला आहे. यामध्ये अत्यंत निकृष्ठ दर्जाचे गट्टू, गावातील सिमेंट रस्त्यावर थातुरमातुर काँक्रीटचे काम व शाळा दुरुस्तीसाठी आलेल्या निधीचा गैरवापर करून हलक्या प्रतिचीची फारशी व ओबडधोबड कलरचे काम करण्यात आले आहे यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख रुपयांचा निधीचा अपहार केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर सावरगाव तांडा येथील धर्मा सीताराम राठोड यांची स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या