💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स...!


💥केंद्राने शेतकऱ्यांवर अन्याय केला ; राज्याने वाऱ्यावर सोडलं : राजू शेट्टी💥 

✍️ मोहन चौकेकर

* रुग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत ; मास्क सक्ती आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल : विजय वडेट्टीवार

* मान्सुन सरींसाठी परिस्थिती सध्या अनुकूल नाही ; कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला आजपासून चार दिवस यलो अलर्ट

* किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न ; शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा एकदा उभं करायचं आहे ; संभाजीराजेंचा निर्धार

* मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला नाही तर, राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे 

* माझी वसुंधरा २.० अभियान अंतर्गत पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी नागपूर महानगरपालिकेचा सन्मान 

* केंद्राने शेतकऱ्यांवर अन्याय केला ; राज्याने वाऱ्यावर सोडलं : राजू शेट्टी 

* आजरा,चंदगड, तिलारी परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत चर्चा,मसाई पठार आता संवर्धन राखीव क्षेत्र

* पावसाळ्यासाठी पुणे पोलीस सज्ज ; आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुणेकर राहणार सुरक्षित 

 * स्वच्छतेत शिर्डीचं साई मंदिर राज्यात अव्वल तर पंढरपूर दुसऱ्या क्रमांकावर 

* ओबीसी राजकीय आरक्षणामुळे रखडलेल्या 14 महापालिका निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याचा अंदाज 

* लवकरच बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित होईल' शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती 

* राज्यात कोरोनाचा आकडा दीड हजाराच्या तर मुंबईत हजाराच्या उंबरठ्यावर, आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा 

* पालखी मार्गावर पाणी, आरोग्यासह स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात...अजित पवारांच्या सूचना

* धक्कादायक : पुण्यात 8 लाखांचे अमली पदार्थ जप्त ; तस्कराला अटक

* मान्सूनपूर्व कामे 90 टक्के पूर्ण झाले ; पुणे महापालिकेचा दावा

* सिंधुदुर्गात आढळला दुर्मिळ नाकाड्या चापडा साप ; तिलारीच्या घनदाट जंगलांमध्ये वावर

* निधी वाटप करताना महाविकास आघाडीमधील काही मंत्री मोबदल्याची अपेक्षा ठेवतात : आशिष जयस्वाल

* साप चावल्याने पालघरमधील बीएसएफ जवानाचा पठाणकोटमध्ये मृत्यू

* शिवरायांच्या मुर्तीला दुग्धाभिषेक करून अडकले विवाहबंधनात : कोल्हापूरमधील अनोख्या विवाहाची जोरदार चर्चा

* मंत्री तुरुंगात, कर्मचारी मात्र एसीत... खात्याचे काम नसतानाही लाखोंचा खर्च ? 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या