💥पुर्णा तालुक्यातील सुहागन येथील छत्रपती संभाजी महाराज विद्यालयाचा दहावीचा निकाल ९९ टक्के...!



💥शाळेतील आठ विद्यार्थ्यांचा गुणवंतांच्या यादीत समावेश : सचिन दशरथ भोसलेने मिळवले ९७.४० % गुण💥

पुर्णा : तालुक्यातील सुहागन येथील छत्रपती संभाजी महाराज विद्यालयाचा २०२२ या वर्षीचा दहावीचा निकाल ९९ टक्के लागला असून या विद्यालयातील प्रविष्ट विद्यार्थी ११४ इतके असून यात ९०% पेक्षा अधिक गुण मिळविणारे ८ गुणवंत विद्यार्थी आहेत तर विशेष प्राविण्य ३९,प्रथम श्रेणी ६०,द्वितीय श्रेणी १४ तर १ विद्यार्थी नापास ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त ९७.४० % गुण सचिन दशरथ भोसले या विद्यार्थाने मिळवले असून सचिन शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले यांचा चिरंजीव आहे.

छत्रपती संभाजी महाराज विद्यालयातील ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अन्य सात विशेष गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शिवम भागवत ९४.२०%,कु.ऋतुजा बुचाले ९३,ऋतुराज शिंदे ९२.६०%,गोरखनाथ भोसले ९२%,ज्ञानेश्वर शिंदे ९१%,कु.माहेश्वरी क्षिरसागर ९०.६०,स्वप्नील राऊत ९०.२०% आदींचा समावेश असून या सर्व गुणवंत विद्यार्थांचे शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या