💥नियुक्तीचे पत्र पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते काळे यांना देण्यात आले💥
परभणी - परभणी तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या बोबडे टाकळी सर्कल प्रमुख पदी जोड परळी येथील पक्षाचे जुने कार्यकर्ते श्री ज्ञानोबा नारायण काळे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते श्री काळे यांना देण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने परभणी जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महानगर पालिका निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष ताकतीने उतरणार असून या निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढविणार आहे. त्या साठी पक्षाच्या संगठन बांधणी चे काम पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी हाती घेतले असून जिल्ह्यातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर व ताकतीने लढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताकतीने कामाला लागले आहेत.
आज नवा मोंढा रोड वरील प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात झालेल्या जिल्हा कार्यकारणी च्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, सुरेश काळे, राजेंद्र काळे, सतीश काळे, किशन काळे, अनिल पडोळे, गजानन एडके, शेख बशीर इत्यादी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या