💥पुर्णा तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीची तयारी पुर्ण परंतु पावसाने फिरवली पाठ....!


💥मागील पाच वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याची दैना काही केल्या संपेना💥 

पुर्णा :- पुर्णा-गोदावरी नद्यांचे पात्र लाभलेला पुर्णा  तालुका मागील तिन दशकापुर्वी संपूर्ण जिल्ह्यात सर्वात सधन व कृषी प्रधान तालुका म्हणून ओळखला जात होता तालुक्यातील शेतकरी गहू,ज्वारी,हरबरा,तुर,मुग,उडीद आदी पिकांसह भुईमुग,कपास,आदी पिकांसह बागायती पिकांसह भाजीपाल्याचे देखील विक्रमी उत्पादन करीत असत परंतु मागील पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे अन्नदाता शेतकरी राजावर अक्षरशः अश्रू ढाळण्याची वेळ आल्याचे निदर्शनास येत आहे.

 पुर्णा तालुक्यात मागील पाच वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतांना या भयावह परिस्थितीला खंबीरपणे तोड देणारा अन्नदाता शेतकरी यावर्षी तरी निदान निसर्गाची खंबीर साथ मिळेल या आशेवर खरीप हंगामातील पेरणीच्या तय्यारीला लागला घरातील दागदागीने विकून प्रसंगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन नांगरणी/कोळपणी करून शेतातील धसकट तनकट पालापाचोळ्याची साफसफाई करीत बि-बियान/खत फवारणीची औषध आदींची जुडवाजुडव करून अन्नदात्या शेतकऱ्याने पेरणीची तयारी केली खरी परंतु ०७ जुन २०२२ ते १७ जुन २०२२ असा दहा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील पाऊस पडत नसल्यामुळे अन्नदाता शेतकरी आभाळाकडे पाहून डोळ्यात अश्रू आणीत देवाला पाऊस पडू दे म्हणून प्रार्थना करीत आहे पेरणीसाठी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्या शिवाय पेरणी तरी कशी करावी ? असा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करीत आहे.

तालुक्यात मागील वर्षी काहीसा बऱ्या प्रमाणात पाऊस झाला होता परंतु नदी नाल्यांसह लहाण मोठ्या ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तीसह सततच्या दुष्काळाला तोंड देत देत सावरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहेअश्या गंभीर परिस्थिती मार्ग काढीत असतांना देखील अन्नदाता शेतकऱ्याला दया दाखवण्या ऐवजी नफेखोर बि-बियान/खत विक्रेते खतांची अतिरिक्त दराने तर बोगस बि-बियानांची विक्री करून शेतकऱ्यांचे आर्थिक सोशन देखील करतांना पाहावयास मिळत आहे यावर्षी कापुस सोयाबीन हळद आदी पिकांना बऱ्या पैकी दर मिळाल्याने अन्नदाता शेतकरी राजाला थोडासा दिलासा मिळाला आता किमान असेच दर टिकून राहावेत आणि या वर्षी पिकांना पोषक असे पर्जन्यमान व्हावे हीच अपेक्षा अन्नदाता शेतकरी राजा ठेऊन असतांना तब्बल दहा दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी राजाचे डोळे आभाळाकडे लागल्याचे दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या