💥शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेची दमदार वातावरण निर्मिती...!


💥उद्यानांसह मैदानांवर जाऊन निमंत्रणाचे वाटप💥

औरंगाबाद / संभाजीनगर- ३ जून

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जूनला होणारी सभा ऐतिहासिक होणार हे नक्की. आठवडाभरापासून ठिकठिकाणी बैठकांसह आता थेट जनसामान्यांशी संवादाच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्याचा धडाका सुरू आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज पदाधिकाऱ्यांनी पहाटे बाळासाहेब ठाकरे उद्यान, बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन, एमजीएम मैदानावर जाऊन मॉर्निंग वॉक, योग साधना, खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी योग साधनेला आलेल्या महिला, नागरिकांनी सभेचे निमंत्रण स्वीकारत या उपक्रमाचे भरभरून कौतुकही केले व सभेला येण्याची खात्री हि दिली.


मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर संभाजीनगर शहरात उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा होत आहे. बाळासाहेबांचे प्रेम असलेल्या या शहराचा कायापालट झाला असून आणखी कितीतरी विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणकोणत्या विषयांवर आपले प्रखर मत मांडतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे यामध्ये केवळ शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. यावेळी संतोष जेजुरकर, राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी, मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, वीरभद्र गादगे, सोपान बांगर, चंद्रकांत देवराज, बद्रीनाथ ठोंबरे, रोहित स्वामी, शिवकुमार देशमुख, अर्जुन बारवाल, किशोर राजपूत किशोर शेळके, सूर्यकांत देवकर,छायाताई देवराज, बिराजदार ताई आदींची उपस्थिती होती. 

----------------------------- 

💥हिंदुत्वाचा हुंकार ऐकण्यासाठी संभाजीनगरकर उत्सुक - आ. अंबादास दानवे 


संभाजीनगरात मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या स्थापनेला यंदा ३७ वे वर्ष असून या निमित्ताने पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठ जूनची जाहीर सभा ऐतिहासिक असणार आहे. सभेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा हुंकार ऐकायलाच हवा ही टॅगलाईन घेऊन आम्ही सर्वत्र नागरिकांपर्यंत पोहचत आहोत. त्यासाठी शिवसैनिकांसह संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक उत्सुक आहेत, असे शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या