💥एसबीआय बँकेतून शेतकऱ्याचे चाळीस हजार रुपये लंपास.....!


💥या प्रकरणी युवकांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे💥

जिंतूर प्रतिनीधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवक शेतकरी परमेश्वर जगताप बँकेत 40 हजार रूपये कर्जाचे फेड करण्यासाठी पैसे घेऊन आला असता बँकेतील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्याच्या खिशातील 40 हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना दि. 28 जून मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आले असून या प्रकरणी युवकांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिंतूर तालुक्यातील पुगंळा गावातील ग्रामस्थ युवक परमेश्वर विश्वनाथराव जगताप, वय 35 वर्षे, व्यावसाय शेती या युवकांनी पोलिसात फिर्याद दिली की मी मंगळवार रोजी दुपारी दीडच्या सुमारास नगर परिषदेच्या बाजूला असलेल्या एस.बी.आय.बँक येथे माझे वडील विश्वनाथराव सखाराम जगताप यांचे खात्यावर असलेल्या क्रॉप लोणच्या 40 हजार रुपये भरण्यासाठी बँकेत आलो असता पैसे भरण्याचे लाइनमध्ये थांबलो व बँकमध्ये पैसे भरण्याची विचारपुस केली असता बँक कर्मचाऱ्यांनी मला सांगीतले 10 तारखेनंतर भरा सवलत तुम्हाला मिळेल त्यावेळेस बँके मध्ये गर्दी होती. नंतर मी विचारपूस करून बँकेबाहेर निघालो बाहेर गेटजवळ येवुन थांबलो असता माझ्या पॅंटीच्या पाठीमगील खिशाला हात लावला पैसे नसल्याचे जानवले नंतर मी बॅकेत गेलो माझे कोणीतरी पैसे चोरले आहेत असे म्हणुन आरडा ओरडा केला परंतु माझे पैसे मिळुन आले नाहीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे माझ्या खिशात असलेल्या दोन हजार रुपयाच्या 20 नोटा असे एकुण 40, हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवून लंपास केले आहे म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती मिळत आहे दिवसाढवळ्या चोरी ची घटना बँकेत घडल्याने शहरी व ग्रामीण ग्रामस्थ नागरिकांत भीतीचे वातावरण दिसत असल्याने पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात वाढ करावी म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या