💥पुर्णेत मागील पाच दिवसाच्या कालावधीत निर्घृण हत्येच्या दोन घटना : तहसिल परिसरात २१ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या...!


💥शहरासह तालुक्यात गुन्हेगारीने डोके वर काढले : हत्या हत्येचा प्रयत्न सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवने अश्या घटनांना वेग💥

पूर्णा (दि.२१ जुन २०२२) - येथील रेल्वे परिसरातील रेल्वेच्या बांधकाम कार्यालय (पिडब्ल्यूडी) परिसरात दि.१५ जुन २०२२ रोजी रेल्वे कर्मचारी नारायण देवराम या ५६ वर्षीय इसमाचा थट्टा मस्करीतून सोबतच्या व्यक्तीनेच चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेला पाच दिवसाचा कालावधी उलटला नाही तोच दि.२० जुन ते २१ जुन २०२२ च्या मध्यरात्रीच्या सुमारास तहसिल कार्यालगत असलेल्या महात्मा फुले नगरला जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावरील महावितरणच्या डिपी जवळ एका २१ वर्षीय तरूणाचा अत्यंत निर्दैयीपणे निर्घृन हत्या करण्यात आल्याची घटना आज मंगळवार दि.२१ जुन रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली अवघ्या पाच दिवसाच्या कालावधीत रेल्वे लोहमार्गा पलिकडील भागात तब्बल दोन निर्घृण हत्येच्या घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली असून शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून निर्घृण हत्या,हत्येचा प्रयत्न मारहान तसेच सार्वजनिक ठिकाणी आपआपसातील किरकोळ वादातून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे गंभीर प्रकार वाढत असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोके वर काढीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

शहरातील लोहमार्गाच्या पलिकडील भागात असलेल्या व तहसिल कार्यालया लगतच्या महात्मा फुले नगराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर अज्ञात आरोपींनी निर्घृणपणे हत्या केलेल्या २१ वर्षीय मयत युवकाचे नाव ओमकार नारायन पवार असे असून तो राहणारा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागणाथ तालुक्यातील शेंदूर सेना या गावचा रहिवासी असल्याचे समजते सदरील घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलिसांनी घटना स्थळाकडे धाव घेऊन घटनास्थळ पंचणामा करून मयत युवकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्नालयात हलवले असून उत्तरीय तपासणी नंतर मयताचे शव नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या