💥महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी राहुल डोंगरे यांची निवड...!


💥मनसे जिल्हाअध्यक्ष रुपेश देशमुख यांनी बहाल केले तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र💥

गंगाखेड प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यात पक्ष पुनर्बांधणीच्या निमित्ताने मनसे जिल्हाअध्यक्ष रुपेश देशमुख यांनी गंगाखेड तालुका अध्यक्षपदी राहुल डोंगरे यांची निवड केली असल्याचे पत्र दिले आहे.


राहुल डोंगरे मनसेच्या पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या विचारधारेशी निगडित मोर्चे आंदोलने मध्ये सहभाग घेतला असल्याने मनसेच्या पुनर्बांधणीसाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे संतोष नागरगोजे अशोक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात फळी निर्माण करत आहेत गाव तिथे शाखा घर तेथे मनसे सैनिक काम करण्यासाठी राहुल डोंगरे यांची जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांनी गंगाखेड तालुकाध्यक्ष पदी निवड केली आहे त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष यादव महात्मे  मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक विधी शाखा जिल्हाध्यक्ष निलेश पुरी मा. जिल्हा संघटक सोनू लाहोटी पूर्णा तालुकाध्यक्ष अनिल बुचाले,पूर्णा शहराध्यक्ष राज ठक्कर,साई टाक ,सचिन रुपणार,निखिल राठोड ,सचिन रुपनर, माधव आयचीत,अनिरुद्ध मोरे आदीसह मनसे सैनिकांनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या