💥शिवसेनेच्या धमकीला शिंदेंचे प्रतिउत्तर : म्हणे कुणाला घाबरवता ? कायदा आम्हालाही कळतो...!


💥आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत - नेते एकनाथ शिंदे

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एक ट्विट करत थेट शरद पवार आणि शिवसेनेला आव्हान दिले आहे. “कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.


*आम्हीच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक :-

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत”, असेदेखील ते म्हणाले. “आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे”, असे शिंदे म्हणाले.

* काय आहे प्रकरण ? :-

एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचेही शिवसेना नेत्यांकडून सांगितले जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताने न आल्याचे कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या