💥अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील मोझरी खु.शिवारात मृत अवस्थेत आढळला पट्टेदार वाघ...!


💥या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-डीसेंबर 2018 मध्ये याच शिवारात वाघ दिसत असल्याने या परिसरातील शेतकरी बांधवानी शेतात जाणे बंद केले होते.या चार पाच महीण्यात बऱ्यापैकी गुरांची शिकार केली असल्याने या परिसरात वाघाचा वावर असल्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. यामुळे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपल्या सहका-यांसह वनविभागासोबत शेतकरी बांधवांच्या सांगण्यावरून या पातुर नंदापुर, सोनखास, दुधलम,मोझरी बु., मोझरी खु.,या जंगलात सर्च ऑपरेशन राबवुन संपुर्ण जंगल पिंजुन काढले होते.यामुळे शेतकरी बांधवांना भयमुक्त केले होते. हे विशेष


                अकोला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस स्टेशन हद्दीतील मोझरी खु. व सोनखास  शेत शिवारा जवळील जंगलात नाल्यालगत आज सकाळी एक पट्टीदार वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली,या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी आणी पिंजर पो.स्टेशन चे ठाणेदार आणी पोलीस कर्मचारी तसेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर  चे जवान हे घटनास्थळी दाखल झाले. : अकोला वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सोनखास मोझरी खु शेत शिवार जवळील जंगलातील (वनखंड क्र.) कंपार्टमेंट नंबर C23 जवळील नाल्या जवळ आज सकाळच्या सुमारास एक पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण जिल्यात खळबळ उडाली आहे,मोझरी खु.येथील शेतकरी अविनाश जयदेव जाधव हे शेतीच्या कामा निमित्य जात असताना त्यांना एक पट्टेदार वाघ नदीच्या काठावरील झुडपा जवळ झोपलेल्या अवस्थेत दिसून आला,सदर शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पिंजर पोलिसांना दिली,पिंजर पोलिसांनी पट्टेदार वाघा संदर्भात माहिती बार्शीटाकळी व अकोला वन विभागाला दिली असता अकोला वन विभागाचे सहाय्यक वन सवरक्षक सुरेश वडोदे सर, वनपरिक्षेत्र अधिकारी राजसीहं ओवे सर, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे सर सह इतर वन कर्मचऱ्यानी घटना स्थळ गाठले यावेळी  वाघाची पाहणी केली असता सदर पट्टेद्वार वाघाच्या शरीरावर कोणत्याही जखमाच्या खुणा व इतर काही संशयास्पद  घडल्याचे आढळले नाही,वन विभागाच्या म्हणण्या नुसार सदर वाघाचे वय अंदाजे 6 ते 7 वर्ष असून या वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक रित्या झाला असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे,सदर वाघाचे शव विच्छेदन अमरावती येथील पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत जागेवरच करण्यात आले. यावेळी अमरावती सह अकोला वनविभागाचे वरिष्ट अधिकरी कर्मचारी तसेच पिंजर पो.स्टेशन चे ठाणेदार अजयकुमार वाढवे बी.ट.ज.राजुभाऊ वानखडे तसेच पोलीस  कर्मचारी व मानद वन्य जिवरक्षक बाळ काळणेसह मोठ्या संख्येने उपस्तीत होते आज सकाळपासून पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान सतीश ठाकुर,विकी साटोटे,ऋषीकेश तायडे, गोविंदा ढोके,मयुर सळेदार,मयुर कळसकार, आशिष मानकर,अरुण लोणाग्रे,धिरज राऊत,यांनी  रुग्णवाहिका सह हजर राहुन शवविच्छेदन मदतीसाठी दिवसभर सहकार्य केले.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या