💥परतूर-नाशिक आई सोबत प्रवासा दरम्यान लासूर स्थानकावर झोपेत उतरलेली अल्पवयीन मुलगी मिळून आली...!


💥यावेळी रात्र पाळीचे स्टेशन मास्टर राजेश गुप्ता यांनी घाबलेल्या मुलीस धिर देऊन स्टेशन मास्तर कार्यालयात थांबवून घेतले💥

03 मे 22 लासुर स्टेशन 

औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील परतूड तालुक्यातील आनंदवाडी येथील कु कल्याणी कोडीराम घुले वय १२ वर्ष ही मुलगी सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेस ने परतूर येथून नाशिक पर्यंत आई सोबत जात असताना झोपेत लासुर स्टेशन येथे उतरले होती

यावेळी रात्रपाळीचे स्टेशन मास्टर राजेश गुप्ता यांनी घाबलेल्या मुलीस धीर देत रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना कळविले या वरून परतूर पोलीस स्थानकाचे पो.नि.काठोळे यांना माहिती दिली असून नातेवाईक शोध कामी पोलीस कर्मचारी तातडीने पाठविले आहे.

या संदर्भात परतूर पोलिसांनी घरच्यांशी संपर्क साधला असता त्यांना नातेवाइकांकडून माहिती मिळाली की ही मुलगी घरून एकटीच निघून गेल्याचे स्पष्ट झाले नातेवाईक लासुर स्टेशन येथे आज सकाळी ०६-०० वाजेपर्यंत पोहचणार होते सदरील मुलीस शिल्लेगाव पोलीस यांच्या मदतीने रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांनी मुलीचे नातेवाईक आजी आजोबा व मामा यांच्याकडे सुपुर्द केले..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या