💥मागील वर्षी पुढील पावसाळ्यापुर्वी त्यांनी स्वखर्चातून रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते💥
किरण घुंबरे पाटील
पाथरी :- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीचा प्रत्यय नुकताच वाघाळा वाशियांना आला गतवर्षी एका व्यक्तीचा उपचारा अभावी रस्त्यातच मृत्यु झाला होता तेव्हा पुढील पावसाळ्या पुर्वी पक्का रस्ता स्वखर्चातून करुन देईल असे आश्वासन प्रेरणाताई वरपुडकर यांनी दिले होते. मंगळवारी ते त्यांनी पुर्ण केले. त्या मुळे वाघाळा वाशियां मधून आनंद व्यक्त होत आहे.
तालुक्यातील वाघाळा गावात आदिवासी पारधी समाज गावापासून दोन अडीच किमी अंतरावर विरळ वस्ती करून राहातात मात्र या वस्तीला जाण्या साठी रस्ता न्हवता.पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड देत येथील रहिवाशांना चार महिने कसे तरी काढावे लागत. त्यातच गत वर्षी आजारी तरुनाला चिखलातुन खांद्यावर आणन्या साठी दोन अडीच तास लागल्याने उपचारा आधिच त्याचा मृत्यू झाला होता. याची चर्चा माध्यमातून होताच आ सुरेशराव वरपुडकर यांच्या स्नुषा तथा जिल्हाबँकेच्या संचालिका प्रेरणाताई वरपुडकर यांनी बैलगाीडीतुन प्रवास करत या वस्तीला भेट देत स्वखर्चातून पक्का रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी नुकतेच पुर्ण केल्याने आदिवासी पाड्यावर आनंद व्यक्त होत आहे.
गेली कित्येक दिवसा पासून या आदिवासी पारधी वस्तीवर जाण्या साठी रस्ता व्हावा अशी मागणी होत होती. पावसाळ्यात गर्भवती महिला,आजारी रुग्न यांना मोठा त्रास सहन करत चिखल तुडवत दोन अडीच किमीचा रस्ता पार करावा लागत असे. अनेकदा गर्भवती महीलांची प्रसुती रस्त्यातच झाली होती,आजारी रुग्न ही वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातच शेतशिवारात जाणे ही गावच्या शेतक-यांना कसरतीचे होत होते. गतवर्षी एक तरुन दगावल्या नंतर प्रेरणाताई वरपुडकर यांनी या घटनेची गंभिर दखल घेत.तात्काळ या आदिवासी पाड्याला भेट देत मृताच्या कुटूंबाला अर्थिक मदत देत या पाड्यावर येणारा रस्ता स्व खर्चातून करून देण्याचे आश्वास दिले आणि पावसाळा संपताच दिपावली पुर्वी मातिकाम करून दिले. त्या नंतर आता या रस्त्यावर जवळपास चारशे ट्रक मुरूम टाकुन हा रस्ता वाहतुकी योग्य अतिषय दर्जेदार केला. या साठी गावातील होतकरू तरुन पिंटू उर्फ आशोक घुंबरे यांनी रस्ता काम करून घेण्या साठी मागिल आठ दहा दिवसा पासुन दिवरात्र परीश्रम घेतले. प्रेरणाताई वरपुडकरांच्या या समाजकार्याची गावभर चर्चा होत असुन आदिवासी पाड्यावर तर आनंदाचे वातावरण आहेच.पण या भागात ज्या शेतक-यांची शेती आहे त्यांना ही आता शेती कामासाठी पावसाळ्यात कुठलीही अडचन येणार नसल्याने शेतकरीही आनंद व्यक्त करत प्रेरणाताईंना धन्यवाद देत आहेत.....
0 टिप्पण्या