💥जितुर येथे माधवानंद स्वामी महाराज संस्थान उमरखेड यांचा होणाऱ्या चातुर्मासाची आढावा बैठक संपन्न झाली...!


💥चातुर्मास नियोजन समितीचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी.रामपूरकर

जिंतूर  तुकाई मंगल कार्यालय येथे आढावा बैठक आयोजन करण्यात आले होते...या निमित्ताने सद्गुरु वामनानंद महाराज यांच्या यांचे प्रतिमेचे पूजन संस्थानचे कुलमुखत्यार महेश कनकदंडे साहेब चातुर्मास नियोजन समितीचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


दोन महिने चालणाऱ्या कार्यक्रमा ची आखणी, नियोजन येणाऱ्या भाविकांची व्यवस्था, वेगवेगळ्या नियोजन समित्या स्थापन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बैठक पार पडली..उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. महेश कनकदंडे यांनी सेवा परमो धर्मः असे प्रतिपादन करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले..


दोन महिने चालणाऱ्या चातुर्मास मध्ये महाराजांच्या पुड्या, लिंगार्चन, रुद्राभिषेक, श्रीमद्भागवत कथा, किर्तने व विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे...कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून मिळेल ती सेवा करण्याचे व कार्यक्रमांचे साक्षीदार होण्याचे आवाहन जिंतुर चातुर्मास समिती  यांनी केले.. 

कार्यक्रमास जिंतूर, भोगाव, चारठाणा, बोरी,चांदज, पाचलेगाव, वरुड, येसेगाव,कौसडी, परभणी,नांदेड येथून शिष्य परीवार व भावीक भक्त उपस्थिती होते...कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन ॲड.योगेश उन्हाळे यांनी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या