💥पुर्णा शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या कट-कारस्थानांना सुरूवात..!


💥राजकीय दडपशहांचा छुपा खेळ : बिनडोक समाजकंठक मद्यपींना हाताशी धरून वाढदिवस शुभेच्छांसह पक्षांच्या पोस्टरांची तोडफोड💥

पुर्णा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जसजशी जवळ येत आहे तसतसे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या कट-कारस्थानांना सुरूवात झाल्याचे निदर्शनास येत असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करून आगामी होणाऱ्या नगर परिषद निवडणूकीत याचा आपल्याला कश्या प्रकारे फायदा होईल या दृष्टीने शहरातील बिनडोक मद्यपी समाजकंठकांना हाताशी धरून सदरील प्रकार जाणीवपूर्वक घडवले जात असतांना शहरातील विविध संवेदनशील भागात पोलिस प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या सिसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील समाजकंठकांना भिती वाटत नसल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा शहरात मागील तिन दिवसात बॅनर (पोस्टर) फाडण्याच्या दोन घटना घडल्या असून यात दि.१३ जुन २०२२ रोजी शिवसेना नगर सेवक ॲड.राजेश भालेराव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे कमाल टॉकीज परिसरात लावलेले बॅनर अज्ञात विघ्नसंतोषी समाजकंठकाने सिसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साक्षीने फाडल्याची घटना घडली होती या घटने संदर्भात रात्री ०१-०० ते ०१-३० वाजेपर्यंत या घटने संदर्भात वाद रंगला होता सदरील घटना ताजीच असतांना काल दि.१४ जुन २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात लावण्यात आलेले बॅनर अज्ञात समाजकंठकाने सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साक्षीने फाडल्याची घटना घडली आज बुधवार दि.१५ जुन २०२२ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने या संदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांनी पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन मनसेचे बॅनर फाडणाऱ्या अज्ञात समाजकंठकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान शहरात बिनडोक समाजकंठक मद्यपींना हाताशी धरून अश्या प्रकारे बॅनर पोस्टर फाडून तसेच किरकोळ वादाला मोठे स्वरूप देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना वेळीच आवर घातला नाही तर पुढील काळ अवघड जाण्याची चिन्ह दिसू लागली आहे...... 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या