💥दहावीच्या परीक्षेत रेणु राऊत 95 टक्के घेऊन महाविद्यालयातुन प्रथम....!

 


💥गणित विषयात 100 पैकी 99 गुण मिळवले💥     

 ✍️ मोहन चौकेकर                     

 बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या जाहीर झालेल्या निकालात बुलढाण्याच्या ज्ञानदीप महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेणु दिनकर राऊत हिने  95 टक्के मिळवुन नेत्रदीपक यश मिळवुन महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळविला आहे.दहीद बुद्रुग सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थीने रोज बुलढाणा येणे येणे जाणे करुन हे नेत्रदीपक यश मिळविले आहे.

विशेष म्हणजे गणितासारख्या अवघड विषयात 100 पैकी 99 मार्क मिळविले आहे. रेणु राऊत हि चिखलीच्या राधा टि हाऊसच्या अंबादास बाहेकर यांची भाची आहे.रेणुचे वडील दिनकरराव राऊत हे शेतकरी असुन बुलढाणाच्या पंजाबराव देशमुख पतसंस्थामध्ये काम करतात.या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद , गावकरी  यांच्यासह  सर्वांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या