💥श्री संचारेश्र्वर प्राथमिक विद्यालयाच्या वर्धापन दिना निमित्त स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार💥
[श्री संचारेश्र्वर प्रा. विद्यालय, जिंतूर या संस्कार केंद्रात संस्थेचा 71वा संस्था वर्धापन दिना निमित्त बी.टी.एस.या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार]
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
संस्कार केंद्रात भारतीय शिक्षण संस्थेच्या दि 28 जून रोजी 71 व्या वर्धापण दिनानिमित्त ध्वजारोहण संस्कार केंद्राचे अध्यक्ष मा.श्री.महालींगआप्पा कुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा.डॉ.श्री. किरणजी बकाण*(तालुका संघचालक), तसेच मा.श्री.रविकुमार पेशकार (भा. शि. प्र.संस्था, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य), मा.श्री.वसंतराव पुराणिक ( स्थानिक शालेय समिती अध्यक्ष), मा.श्री. सचिन रायपत्रिवार (योग शिक्षक), स्थानिक संस्कार केंद्राचे सन्मानिय पदाधिकारी, सन्मानिय पालक, मातापालक सदस्या यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांचा परिचय श्री शिवाजी सोमोसे सरांनी करून दिला.मान्यवरांच्या स्वागतानंतर मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी सरांनी संस्था परिचय करुन दिला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच संस्थेचे ध्येय आहे असे ते म्हणाले. यानंतर बी.टी.एस. या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी मा.श्री. किरणजी बकाण यांनी मार्गदर्शन करताना संस्था वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याने किमान तीन विद्यार्थ्यांना मदत करण्याचा तसेच नियमित अभ्यास करून गुणवत्ता संपादन करण्याचा संकल्प करण्यास सांगितले. श्री पेशकार सरांनी अध्यक्षीय समारोप करताना सर्व सन्मानिय सभासद, पालक शिक्षक/शिक्षिका यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमाने,सहकार्याने आपल्या या संस्कार केंद्राची गुणवत्ता व भौतिक परिस्थिती निश्चितच वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न करूत असे आश्वासन देऊन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उषा खराबे तर आभार प्रदर्शन श्री किरण नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार केंद्रातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राणे करण्यात आला...
0 टिप्पण्या