💥मुरुमखेडातीलल राष्ट्रीय पेयजल योजनेत सरपंच,पाणी पुरवठा समिती,अधिकारी,गुत्तेदार यांनी केला 64 लाख रुपयाचा अपहार....!


💥सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल तोष्णीवाल यांनी केली गंभीर आरोप💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील मुरूमखेडा  गावात राष्ट्रीय पेय जल योजनेत 64 लाख रुपयाचा पाणी पुरवठा  योजनेत बोगस काम करून तत्कालीन सरपंच, पाणी पुरवठा समिती व शासकीय अधिकारी, गुत्तेदार यांनी या सर्वानी संगमत करुण भ्रष्टाचार झाल्याची तक्रार रहिवासी ब्रिजलाल तोषनीवाल यांनी दिनांक 20 जून रोजी त्यांच्या राहत्या घरी एक पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली याबाबत अधिक माहिती अशी की मुरूमखेडा येथील 200-13 -14 या साली मुरूमखेडा येथील ग्रामस्थांना पीण्याचे पाणी उपलब्ध व्हावा म्हणून राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 64 लाख रुपयाचं पाणी पुरवठा योजनेचे निवेदा काढण्यात आली आणि या कामाला प्रत्यक्षात सुरुवात हि झाली परंतु निवेदा मध्ये ठरलेल्या कोणत्याही बाबींचा, वस्तूचा वापर न करता बोगस व चुकीचे पद्धतीने काम करून कार्यालयातील नोंद पुस्तकात खोट्या नोंदी केल्याचे आरोप तोष्णीवाल यांनी केला आहे. 

या सर्व बोगस कामा मूळे राज्य पेयजल योजना मधून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही कार्यल्यात बोगस व खोटे व बनावट कागदपत्रे लावून हि योजना ग्रामपंचायत ने ताब्यात घेतले म्हणू शासन दरबारी मांडून या योजनेचे 64 लाख उचलून घेतले व कामात मोठा भ्रष्टाचार झाल्या चा समोर आला आहे याबाबत तोष्णीवाल यांनी पुराव्या सहित शासनाकडे तक्रार दाखल केली असून या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या मध्ये जे कोणी दोषी असेल त्याच्यावर पोलीसात गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे व तसेच मुरूमखेडायातील ग्रामस्थांचा हक्काचा पाणी राष्ट्रीय पेय जल योजनेतून त्यांना उपलब्ध करून घ्यावे असे या तक्रारीत म्हटले आहे.

* धरण ऊसाला आण कोरड घशाला :-

जिंतूर तालुक्यातील मुरूमखेडा गावचे गावकऱ्यांना धरण उशाला असतानाही कोरड मात्र घशाला  अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मुरूमखेडा येथील सर्व गावकऱ्यांना पिण्याचे पाणी योग्य वेळेवर मिळावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  ब्रिज गोपाल तोष्णीवाल यांनी निवेदनात केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या