💥राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त आज पिंगळी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...!


💥यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले💥

परभणी/पिंगळी : वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही आता काळाची गरज आहे. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊनच पिंगळी येथील ग्रामपंचायत सदस्य,पर्यावरण प्रेमी प्रशांत धबाले यांच्या वतीने हा समाजोपयोगी उपक्रम घेतला.

 आज दि. 26 जून 2022 रोजी पिंगळी येथील स्मशानभूमीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर येथील स्मशानभूमीत सकाळी 10 वाजता वड, पिंपळ ,कडुलिंब या सारख्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक झाडाला याप्रसंगी ट्री गार्ड देखील लावण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी दतराव गरुड, ज्ञानराज चव्हाण, गुलाबराव गरुड, राज गरुड ,अंगद गरुड, विजय गरुड,गाडेकर सर,बबन सावंत,विकास लोखंडे,अमोल  सावंत, नूर भाई,आकाश सावंत, सुरेश सावंत सतीश सावंत मयूर धबाले ग्रामपंचायत सदस्य प्रशांत धबाले व त्यांच्या मित्र मंडळीच्या पुढाकारातून  सामाजिक सलोखा जपण्याचा हा आदर्शवत उपक्रम पार अगदी उत्साहात संपन्न झाला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या