💥नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषणाला जाहीर पाठिंबा : रवींद्रसिंघ मोदी


💥असे पत्रकार व समाजसेवक स.रवींद्रसिंघ मोदी यांनी  प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमाने जाहीर केले आहे💥


नांदेड (दि.23 मे 2022) : येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार, दि. 23 रोजी हजूरी साधसंगत आणि बाबा फतेहसिंघ जी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे गुरुद्वारा बोर्ड संबंधी मागण्या घेऊन चक्री उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. सर्व मागण्या रास्त असल्यामुळे मी व्यक्तिगतरित्या वरील शांतिपूर्वक चक्री उपोषणास आपला पाठिंबा व्यक्त करीत आहे. असे पत्रकार व समाजसेवक स. रवींद्रसिंघ मोदी यांनी  प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमाने जाहीर केले आहे. 

रवींद्रसिंघ मोदी यांनी पुढे म्हंटलं आहे की, गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्था कायदा 1956 मधील कलम आकरा मधील मागील संशोधन रद्द करून स्थानीक शीख समाजाला न्याय मिळणे गरजेचे आहे. इतर मागण्यावर सुद्धा शासनाने विचार करावा व नांदेडच्या शीख समाजाला अनुकूल असणाऱ्या अशा नवीन बोर्डाचे गठन करण्यात यावेत. बोर्डाचे निर्णय घेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी नांदेडचे स्थानीक असले पाहिजे असे माझे मत आहे....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या