💥पुर्णा शहरातील आनंद नगर,अमृत नगर,आदर्श कॉलोनी या उच्चभ्रू वसाहतीतील पाण्याचा प्रश्न गंभीर....!


💥जलकुंभ किंवा जलवाहिनी टाकून कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडन्यासाथी मनसे करणार १ जून रोजी धरणे आंदोलन💥

पूर्णा (दि.२६ मे २०२२) - शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहतीत मोडणाऱ्या आनंद नगर आदर्श कॉलोनी अमृत नगर राजे संभाजी नगर अलंकार नगर आदी भागांमध्ये नगर परिषद प्रशासनाकडून शासनाच्या विविध विकास योजनांसह विविध राज्यसभा विधान परिषद सदस्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून काही प्रमाणात थातूरमातूर तर काही केवळ कागदोपत्री विकासकाम झाली खरी परंतु या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र अद्यापही शेषनागाच्या फनी प्रमाणे कायमस्वरूपी डोके वर काढूनच उभा असल्याचे निदर्शनास येत असून आनंद नगर,आदर्श कॉलोनी अमृत नगर राजे संभाजी नगर अलंकार नगर आदी भागांमध्ये गेल्यां विस ते पंचवीस वर्षा पासून पाणी प्रश्न भेड़सावत आहे या परीसरातुन घर पट्टी,नळ पट्टीच्या माध्यमातुन नगर परिषद प्रशासनाला लाखों रुपयाचा महसुल मिळतो परंतु या भागाचे दुर्दैव दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होत आहे निवडून दिलेले लोकप्रतिनिधि एखाद्या मांडूळा प्रमाणे दुतोंडी कारभार चालवून केवल वेळ काडू धोरन रबवत असल्याचे दिसत आहे.

शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहत म्हणून समजल्या जाणाऱ्या आनंद नगर आदर्श कॉलोनी अमृत नगर राजे संभाजी नगर अलंकार नगर या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा कोट्यावधी रुपयंचा रुपयाचा निधी नगर परिषद प्रशासनाला प्राप्त झाला परंतु प्रत्यक्ष कामे झालीच नाहीत या भागात व्यापारी,नौकरदार वर्ग मोठ्या संख्येने राहतो या प्रश्नावर आवाज़ उठवायला मात्र कोणीही पुढे येत नाही नेमका याच गोष्टीचा मागील अनेक वर्षापासून भ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि नगर परिषदेतील भ्रष्ट कारभारात बरबटलेले अधिकारी/कर्मचारी फायदा घेत असल्याचे दिसत आहे. 

गेल्यां वर्षा पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आनंद नगर आदर्श कॉलोनी अमृत नगर अलंकार नगर आदि भागासाठी जलकुंभ कींवा जलवाहिनी टाकून कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवन्याची मनसे मागणी करीत आहे परंतु या जनहीताच्या मागणीकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करी आहे या भागातील जनतेच्या न्यायिक मागणीकडे मुख्याधिकारी अजय नरळे तात्काळ लक्ष देऊन या भागांतील पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालया समोर १ जुन २०२२ रोजी धरने  आंदोलन करण्यात येईल आशा इशारा एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नरळे यांना मनसेचे शहराध्यक्ष गोविंद (राज) ठाकर यांच्या सह वार्डतील सेकड़ो नागरिकांनी दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या