💥राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विज्ञान संकुलाचे भूमिपूजन...!


💥यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्यायमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.१० मे २०२२) - राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज मंगळवार दि.१० मे २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नियोजित विज्ञान संकुलाचे भूमिपूजन संपन्न झाले. 

यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्यायमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खा.बंडू जाधव, हिंगोलीचे खा.हेमंत पाटील,आ.डॉ.राहुल पाटील,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हा परिषदेचे सीईओ शिवानंद टाकसाळे,परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार विद्यापीठ परिसरातील नियोजित जागेवर भव्य विज्ञान संकुल उभारण्यात येणार आहे. हे संकुल उभारणीसाठी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.

या विज्ञान संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व नागरिक यांच्यासाठी विविध विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान संकुलाच्या नियोजित स्थळी सायंकाळी ०५-०० वाजता भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर सुवर्णजयंती दीक्षांत सभागृह विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय (अश्वमेध क्रीडांगण) याठिकाणी  परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांनी आजपर्यंत केलेल्या वैज्ञानिक उपक्रमांचे,  'तांबट' शॉर्ट फिल्म चे सादरीकरण करण्यात आले. तसेच 'डे टाईम ऍस्ट्रॉनॉमी मध्ये सूर्यदर्शन व सौर डाग यांचे निरीक्षण करण्यात आले.त्यानंतर इग्नायटेड माईंडस या विद्यार्थी गटांनी तयार केलेल्या रीसर्च पेलोड सॅटॅलाइटचे प्रक्षेपण करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या