💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा अजब कारभार 'धन्याला धत्तुरा अन् उपऱ्याला मलीदा'....!


💥२१ वर्षापासून सेवा बजावणाऱ्या कामगारावर उपासमारीची वेळ अन् आर्थिक तडजोडीतून भरतीचा रंगला खेळ💥

💥मागील अनेक वर्षापासून करतोय रोजंदारी कर्मचारी म्हणून काम ; वेतन देण्यासही टाळाटाळ💥

पुर्णा (दि.२० मे २०२२) ; पुर्णा नगर परिषदेचा कारभार म्हणजे 'अंधेर नगरी चौपट राज ? अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी प्रत्येकालाच इथे पैसे कमावण्याची खाज' एकंदर असा अजब कारभार नगर परिषदेचा झाला असून मागील दोन दशकापासून रोजंदारी कामगार म्हणून नगर परिषद प्रशासनात इमाने इतबारे सेवा बजालववणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करण्याऐवजी नियमबाह्य पध्दतीने राज्यात नौकर भरतीवर संपूर्णतः प्रतिबंध असतांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नगर पालिका प्रशासनाची कुठल्याही प्रकारचा लेखी आदेश नसतांना आर्थिक तडजोडीतून प्रशासकीय अधिकारी सय्यद इमरान सय्यद अशफाक,आस्थापणा विभागाचे प्रशासकीय अधिकारी नंदलाल चावरे यांनी एक अनुकंपाधारकासह अन्य कामगारांची बेकायदेशीर भरती केल्याचे प्रकरण कर्मचाऱ्यांच्या पगार पत्रकाच्या यादीवरून नुतन मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच गदारोळ माजला परंतु सदरील गंभीर प्रकरावर मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासह प्रशासक सुधीर पाटील यांनी देखील या प्रकरणावर सोईस्कररित्या पडदा टाकला असल्याचे निदर्शनास येत आहे.

 पुर्णा नगर परिषदेतील 'अंधेर नगरी चौपट राज' कारभारात सर्वात गंभीर बाब म्हणजे पाणीपुरवठा विभागात ९ एप्रिल १९९२ पासून रोजंदारी कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावणारे कर्मचारी तुकाराम गुनाजी सोळंके यांच्यावर नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याचे निदर्शनास येत असून त्यांना नगर परिषद पाणीपुरवठा विभागात कर्तव्य बजावतांना तब्बल २१ वर्षाचा कालावधी उलटत असतांना बोगस काम सोईस्कररित्या पार पाडणाऱ्या नगर परिषदेतील आस्थापणा विभागातील भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याचे संपूर्ण रिकॉर्डच गहाळ केल्याची गंभीर बाब समोर आली असून बोगस कामगारांचे रिकॉर्ड मात्र अत्यंत सोईस्कररित्या तय्यार करून आपल्या कर्तव्याशी बेईमानी केल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात मागील २१ वर्षापासून सेवा बजावणारे तुकाराम सोळंके यांच्या नंतर सन २००० साली नगर परिषदेत रोजंदारी कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या तब्बल आठ ते दहा रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी चावरे व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याकडून कायम करण्यात आले परंतु रोजदारी कामगार म्हणून कर्तव्य बजावणारे तुकाराम सोळंके यांच्या नावाचा पदाचा सेवा कार्यकाळाचा राज्यातील नगर परिषदा मधील दि.११ मार्च १९९३ ते दि.२७ मार्च २००० या कालावधी मधील रोजंदारी कर्मचारी समावेशनाच्या कार्यवाही मध्ये जाणीवपूर्वक समावेश न केल्यामुळे त्यांना कायम स्वरूपी मिळणाऱ्या नौकरीच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे महाभयंकर पाप नगर परिषदेतील भ्रष्टाचाऱ्यांनी केल्यामुळे या पापाची परतफेड त्यांना बोगस नौकर भरती करून करण्याची वेळ आली असतांना मुख्याधिकारी नरळे व प्रशासक पाटील मात्र त्यांच्या पापांवर पडदा का टाकत आहेत ? असा प्रश्न जनसामान्यात उपस्थित होत आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या