💥औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर-करजगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे पटरीवर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह...!


💥सदरील मृत इसमाच्या अंगावर पांढऱ्या रंगाची बनीयान निळ्या-पांढऱ्या रंगाची ट्रेकपँट आहे💥

औरंगाबाद : जिल्ह्यातील लासुर करजगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे पटरीवर आज रविवार दि.१५ मे २०२२ रोजी रात्री ०८-०० वाजेच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून सदरील मृत इसमाच्या अंगावर पांढऱ्या रंगाची बनीयान निळ्या-पांढऱ्या रंगाची ट्रेकपँट आहे.


सदरील अनोळखी इसमाचा मृतदेह लासुर-करजगाव स्टेशन दरम्यान रेल्वे किलोमीटर ७७/ ६-८ रेल्वे पटरी जवळ आढळला आहे.मयत इसमाची ओळख पटविण्यासाठी नातेवाईक किवा ओळखीच्या लोकांनी शिल्लेगाव पोलीस स्टेशन किंवा रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना 9158888159,967300861 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या