💥प्रलंबित पिक विमा बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचा कृषी अधीक्षक अधिकारी यांना घेराव...!


💥शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून सहकार्य न मिळता आपमानास्पद वागणूक💥

परभणी (दि.२७ मे २०२२) - जिल्हयातील अनेक शेतकऱ्यांनी रिलायन्स विमा कंपनीकडे कृषी विमा भरलेला आहे त्यातील काही शेतकर्यांना पिक विमा मिळालेला पण आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना वेळेवर तक्रारी करुनही पिक विमा मिळालेला नाही. यासाठी शेतकरी रिलायन्स विमा कंपनीच्या परभणीतील कार्यालयात गेले असता त्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून सहकार्य न मिळता आपमानास्पद वागणूक मिळत आहे. 

पिक विमा का मिळाला नाही याची माहिती घेण्यासाठी रिलायन्स पिक विमा कंपनीकडे गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिले जातात . केलेल्या तक्रारीची पोचपावतीची प्रत दिल्यावर देखील परत - परत पोच पाचतीची प्रत मागितली जाते. रिलायन्स पिक विमा कंपनी व केंद्र सरकारच्या आदेशानुसार अनेक शेतकऱ्यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल केली असताना पण पीक विमा मिळाला नाही याबाबत परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा येथील शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी स्वरुपात तक्रार केलेली होती त्या तक्रारीची तत्काळ दाखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व शेतकऱ्यांचे शिष्ट मंडळासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. व्हि. डी. लोखंडे यांना कार्यालयात जाऊन रिलायन्स पीक विमा कंपनी चे प्रतिनिधी यांना चांगलेच धारेवर धरले. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीती तक्रारी दिल्या त्यांना तत्काळ पीक विमा मिळेल व यांनी तक्रारी चा अर्ज दिला नाही त्यांना सरसगट पीक विमा मिळेल असे आश्वासन श्री. लोखंडे व रिलायन्स पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले. त्याच बरोबर तक्रार घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना विमा कंपनी च्या प्रतिनिधींना देण्यात आल्या.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, परभणी शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, हनुमान गरुड, पांडुरंग गरुड, कुंडलिक गरुड, नागनाथ गरुड, तुकाराम गरुड, ज्ञानोबा गरुड, त्रेंबकराव गरुड, विष्णू गरुड, बाळू गरुड, तुकाराम गरुड, नरहरी गरुड, दत्तराव राऊत, सुभाष राऊत, मारुती गरुड, देविदास गरुड, मनोहर गरुड, मुंजाजीराव गरुड यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या