💥भाजीपाला उत्पादक परभणी शेतकरी ग्रुपची अक्षवृत्त रेखावृत्त बदलानुसार दरमहा भाजीपाल्यावर चिकित्सक अभ्यासपूर्ण बैठक..!

 


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकीशनराव साळवे व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची उपस्थिती💥 


पूर्णा (दि.06 मे 2022) :- परभणी जिल्ह्यातील शेतकरी एकनाथराव साळवे यांच्या शेतामध्ये भाजीपाला उत्पादक ग्रुप तालुका परभणी यांची बैठक संपन्न....कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकीशनराव साळवे,प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी विजय लोखंडे,आरटीओ श्रीकृष्ण नखाते,कृषी अभ्यासक यू.एन.आळशे,तंत्रज्ञान प्रमख आहेरे,थोरात,रिलायन्स पवार,अदीची उपस्थित होती.


      अधिक माहीतीनुसार एकनाथराव साळवे यांच्याकडे एकूण 14 एकर रंगीबिरंगी टरबुजाची लागवड 5 ते 6 वाण आहेत ते दरवर्षी रिलायन्स फाउंडेशनच्या संपर्कात  असतात हे पीक पाणी  इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मीळावे  यामुळे ही बैठक आयोजित केली होती परभणी जिल्ह्यातील सर्वच शेतकरी उपस्थित होते आळसे सर यांनी सोयाबीन विषयी माहिती दिली सोयाबीन पिकाच्या उत्पादनासाठी बियाणे खूप महत्त्वाचे आहे विद्यापीठाच्या जाती ह्या वापरण्यासाठी खूपच चांगले आहेत व उत्पादन देणारे आहे असे मार्गदर्शन केले 

     परभणी जिल्ह्याची आरटीओ श्रीकृष्ण नखाते पुढे बोलताना माती विषयक  आपली माती जपली पाहिजे तरच आपल्या शेतीमध्ये खूप पिक सुंदर येईल तसेच आपल्या शेतीमध्ये जे विकते तेच पीकवल पाहिजे  असे मत मांडले. जिल्हा कृषी अधिकारी लोखडे सर यांनी कृषी विभागाच्या अनुदाना बद्दल खूप मोलाची माहिती दिली मी सदैव तुमच्यासोबत आहे अनुदाना्र फळबाग व ठिबक तुषार सर्व काही शेतकऱ्यांना मिळेल यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज करणे खूप गरजेचे आहे काही तांत्रिक अडचणी आल्या तर मी आपल्या सोबत आहे अशी ग्वाही दिली दिलीप मोरे सर यांनी आपला माल हा जर प्रक्रिया करून जर विक्री केला तर त्याचे चार पट पैसे होतील याबद्दल सखोल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रक्रिया उद्योगासाठी ज्या काही अडचणी असतील त्यासाठी मी तुमच्या सदैव सोबत आहे अशी ग्वाही दिली रिलायन्स वाल्यांनी पण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल हा आम्ही सदैव घ्यायला तयार आहे त्यासाठी अगोदर कायदेशीर  बाबी आहेत कोड नंबर वगैरे त्या सर्व काही शेतकऱ्यांनी आधीच केल्या पाहिजेत तरच आम्ही आपला माल निश्चित घेऊ रिलायन्स वाले सर्वच माल  घेतात भाजीपाला फळबाग व इतर त्यासाठी तुम्हाला सर्वांशी संपर्क करणे खूप गरजेचे आहे असे उद्गार रिलायन्स  यांनी सागीतले आहे या बैठकीला परभणी जिल्ह्यातील सर्वच शेतकरी उपस्थित होते हा उपक्रम भाजीपाला उत्पादक ग्रुप  पाच ते दहा वर्षापासून सदैव दर तीन महिन्याला ही बैठक घेत आहे त्याबद्दल परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन होत आहे व त्यांना नवनवीन प्रयोगाची संधी मिळत आहे .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रगतिशील शेतकरी पडीत थोरात यांनी केले प्रास्ताविक प्रगतिशील शेतकरी एकनाथराव साळवे यांनी  आभार प्रदर्शन नाईक नवरे यांनी केले       

           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजीपाला उत्पादक ग्रुपचे  संचालक पंडित थोरात, जनार्दन आवरगंड प्रकाश हरकळ, मोरे , संभाजी गायकवाड़ ,सुदाम माने आदीनी परीश्रम घेतले व पंचक्रोशी तील शेतकरी मोठ्या सखेने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या