💥परभणीत स्व.देविदासराव कुलकर्णी यांच्या स्मृति दिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गुरूवारी व्याख्यान...!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सरोजताई देशपांडे (अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणी) या राहणार आहेत💥

परभणी (प्रतिनिधी) :- मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या वतीने साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीतील निष्ठावान मार्गदर्शक कार्यकर्ते स्व.देविदासराव कुलकर्णी यांच्या स्मृति दिनानिमित्त बी.रघुनाथ महाविद्यालय, जिंतूर रोड, परभणी येथे गुरुवारी दि.१९ मे रोजी सायं. ६:३० वा. मराठी भाषा सल्लागार समिती अध्यक्ष तथा माजी संमेलनाध्यक्ष मा.श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांचे मराठी भाषा : स्थिती, गती आणि प्रगती या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. अध्यक्षस्थानी सौ.सरोजताई देशपांडे (अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणी) या राहणार आहेत.  या व्याख्यानास श्रोत्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या