💥पुर्णेतील भारतीय स्टेट बँकेचे कर्तव्यदक्ष शाखाधिकारी गोपाळ काटोले यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न....!


💥महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श व प्रेरणास्थान त्यांच्या विचारांवर व कार्यावर माझी श्रद्धा - गोपाळ काटोले

पूर्णा (दि.११ मे २०२२) - येथील भारतीय स्टेट बँकेचे कर्तव्यदक्ष शाखाधिकारी गोपाळ काटोले यांचा भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने दि.०९ मे २०२२ रोजी भारतीय स्टेट बँकेच्या सभागृहांमध्ये जयंती मंडळाकडून सन्मानपत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शाल पुष्पहार व पेढा भरवून अत्यंत आदरपुर्वक भव्य सन्मान करण्यात आला.

भारतीय स्टेट बँकेचे शाखाव्यवस्थापक श्री काटोले यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शक केला असून बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांसह कर्जधारक शेतकरी यांना अत्यंत सन्मानपुर्वक मार्गदर्शन करून त्यांचे समाधान करण्याला त्यांनी प्राथमिकता दिल्यामुळे त्याच्या या मनमिळावू स्वभावामुळे बँकेचा कारभार कमालीचा सुधारला असून आपल्या कर्तव्याशी सातत्याने एकनिष्ठ राहून ते सातत्याने सामाजिक कार्यातही भाग घेता असतात पुर्णा शहरातील बुध्द विहारात दि.२४ एप्रिल २०२२ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरामध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जयंती मंडळाकडून गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालया चे प्राचार्य डॉक्टर राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांमध्ये भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक गोपाळ काटोले यांनी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले होते.त्याच प्रमाणे व्यवसाय कसा सुरु करावा बँकेतून कशा पद्धतीने कर्ज घ्यावे कशा पद्धतीने फेडावे याबद्दल यथोचित मार्गदर्शन केले होते.

यावेळी पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी ही यथोचित मार्गदर्शन केले होते या कार्यक्रमात ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरसेवक ॲड. हर्षवर्धन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती जयंती मंडळाने भारतीय स्टे बँकेचे शाखाधिकारी  गोपाळ काटोले यांच्या सामाजिक बांधिलकीची नोंद घेऊन त्यांचाषबँकेच्या सभागृहांमध्ये यथोचित सन्मान केला याप्रसंगी जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले, सचिव विजय खंडागळे,सहसचिव साहेबराव सोनवणे,राहुल धबाले, दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सन्मानपत्र चे वाचन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले सत्काराला उत्तर देताना गोपाळ काटोले म्हणाले या सत्कार समारंभातून मला कामाची नवी ऊर्जा मिळेल बँकेच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील शोषित पीडित वंचित सुशिक्षित बेरोजगार शेतकरी व महिलां वर्गांसाठी प्राधान्यक्रमाने मी समर्पित भावनेने राबवेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श व प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या विचारांवर व कार्यावर माझी श्रद्धा आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.यावेळी बँकेचे सर्व कर्मचारी सेवक वर्ग उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या