💥खासदार भावना गवळींच्या उत्तम आरोग्यासाठी युवासेनेचा पाळेश्वराला दुग्धाभिषेक....!


💥खा.गवळींच्या उत्तम आरोग्यासाठी केली पुजाअर्चा💥

फुलचंद भगत

वाशिम - वाशीम यवतमाळ मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी यांच्या २३ मे रोजी वाढदिवसानिमित्त युवासेना जिल्हा शाखा व महिला आघाडीच्या वतीने स्थानिक भगवान पाळेश्वर मंदिरात जलाभिषेक, दुग्धाभिषेक व पुजाअर्चना करण्यात आली.

    या कार्यक्रमाला युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, शहरप्रमुख गजानन ठेंगडे, उपशहरप्रमुख आकाश कांबळे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सुनिता गव्हाणकर, युवतीसेना उपजिल्हाप्रमुख भुमिता मुळे, सचिव शितल गर्जे, वनिता अलाटे, जया इंगोले, ज्योती नप्ते, शारदा कच्छवे, उज्वला फलके, युवासेना उपतालुकाप्रमुख शिवम घुगे, रवि खडसे, मनोज खडसे, शिवम खडसे, आसिफ पप्पुवाले, ज्ञानेश्वर गोरे, सुमित ठोंबे, अजय सुरुशे, रवि देशमुख, प्रसिध्दीप्रमुख नारायण ठेंगडे आदींसह युवासैनिकांची उपस्थिती होती. यावेळी पदाधिकार्‍यांच्या हस्ते भगवान पाळेश्वराची पुजाअर्चना करण्यात आली. तसेच सामुहिक जलाभिषेक व दुग्धाभिषेक करुन वाढदिवसानिमित्त खा. गवळी यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच ईडीच्या फेर्‍यातुन खासदारांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी पाळेश्वराकडे युवासैनिकांनी साकडे घातले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या