💥ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात धडक...!


💥कार्यक्षेत्राबाहेरील गेट केन ऊस आणून गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी💥  


पुणे (दि.१८ मे २०२२) - मराठवाड्यासह राज्यातील ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस संबंधित क्षेत्रातील साखर कारखान्यांनी  गाळपसाठी वेळेवर नेला नाही त्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ५० हजार (दिड लाख रुपयें) रुपये नुकसान भरपाई  मिळाली पाहिजे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व पदाधिकारी पुण्यातील साखर आयुक्तांच्या कार्यालयात धडक देऊन साखर आयुक्तांना धारेवर धरले.

साखर आयुक्त पुणे यांना मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात असे नमूद करण्यात आले की ज्या कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप न करता कार्यक्षेत्राबाहेरील गेट केन ऊस आणून गाळप केला आशा कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ५० हजार (दिड लाख रुपयें) रुपये नुकसान भरपाई देखील देण्या यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साखर आयुक्त कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले  यावेळी दिलीप धोत्रे संतोष नगरगोजे अशोक तावरे प्रकाश महाजन व परभणी जिल्हा अध्यक्ष रुपेश सोनटक्के व इतर महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या