💥यावर्षी चारही महिने सावत्रिक चांगला पाऊस - ज्योतीष्याचार्य पवन शर्मा


💥यावर्षी जुन महिन्यात मृग व आद्रा नक्षत्रात पाऊसाची थोडी सुरुवात होऊन जुनच्या शेवटी वार्‍यावादळ्यासह वृष्टी योग💥

फुलचंद भगत

वाशिम - ग्रह, नक्षत्रांच्या हालचालीनुसार व उत्तम योग बघता यावर्षी सार्वत्रिक चांगला पाऊस पडेल तसेच काही भागात पाऊस चांगलाच धुमाकुळ घालेल असे भाकीत प्रसिध्द ज्योतिष्याचार्य व वास्तुतज्ञ पवन गोवर्धन शर्मा यांनी केले आहे.

    यावर्षी जुन महिन्यात मृग व आद्रा नक्षत्रात पाऊसाची थोडी सुरुवात होऊन जुनच्या शेवटी वार्‍यावादळ्यासह वृष्टी योग आहेत. २५ मे दुपारी २.५२ मि. ला सुर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. त्यावेळी कन्या लग्न वृषभ नवांशात उदीत आहे. या नक्षत्रात वार्‍या वादळ्यासह पाऊसाचे योग आहेत. ८ जुन दुपारी १२.३७ मि. सुर्य मृग नक्षत्रात प्रवेश करेल. नक्षत्र प्रवेशवेळी सिंह हे अग्नीतत्व लग्न वृश्चिक नवांशात उदीत आहे. गुरू, मंगळ जल राशीत राहतील. दिवसा ऊन व सायंकाळनंतर पाऊस असे हे नक्षत्र राहील. १५ जुन संपुर्ण महाराष्ट्र पाऊसाला सुरूवात होईल. एकंदरीत ग्रहयोग बघता यावर्षी ४ ही महिने उत्तम पाऊस राहील. गुरू मीन राशीत अस्थिर झाल्यामुळे काही भागात पाऊस धुमाकुळ घालेल असे भाकीत प्रसिध्द ज्योतीष्य व वास्तुतज्ञ पवन शर्मा यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या