💥पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत प्रशासनाने पांघरला बेशर्मीचा बुरखा ? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्कडे सपशेल दुर्लक्ष...!


💥गौर ग्रामस्थ बेहाल ; पाणीपुरवठा योजनेचा कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी कागदोपत्री गिळकृत करणारे मालामाल💥


पुर्णा (दि.११ मे २०२२) - तालुक्यातील गौर या गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने भर उन्हाळ्यात गंभीर स्वरूप धारक केले असून तब्बल साडेचार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मागील दिड दशकापासून लोकमतांवर निवडून येणाऱ्या दिड शहाण्यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखीअद्याप पर्यंत या गावातील पिण्यासह सांड पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही परंतु कागदोपत्री थातूर मातूर काम केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भासवून पाणीपुरवठा योजनेचा शासकीय विकास निधी गिळकृत केल्यामुळे आज या गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.


तालुक्यातील गौर गावातील अबालवृध्द नागरिक माता-भगीनी डोक्यावर हांडे-भांडे घेऊन पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी एक ते दिड किलोमीटर अंतराचा पायदळी प्रवास करून शेतशिवारातील विहिरी ओढ्यांवरून पाणी आणून स्वतःसह कुटुंबाची तहाण भागवत असतांना संबंधित गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच/ग्रामविकास अधिकारी गावातील पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्याऐवजी वेळकाढू धोरणाचा अवलंब करीत पाणीपुरवठा योजनेसाठी 'जलजिवण मिशन' अंतर्गत आलेला कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी गावात केवळ पाईप लाईन अंथरण्याचे नाट्य करून कागदोपत्री जिरवण्याचा कुटील डाव तर रचत नाही ना ? असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये उपस्थित होत असून गौर ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराला पुर्णा पंचायत समितीसह जिल्हा परिषद परभणी येथील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे खंबीर पाठबळ मिळत असल्यामुळे सरंपच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर सातत्याने येणाऱ्या प्रत्येक शासकीय विकासनिधीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावतांना दिसत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या