💥पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना खत बियाणे उपलब्ध देण्यासह शेतकरी हिताच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करा..!


💥प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली मागणी💥

पुर्णा (दि.२३ मे २०२२) - तालुक्यातील शेतकऱ्यांना खत बियाणे उपलब्ध देण्यासह शेतकरी हिताच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करा अशी जोरदार मागणी आज सोमवार दि.२३ मे २०२२ रोजी पुर्णा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के व प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी तालुकाप्रमुख नरेश जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नेऊन निवेदन देण्यात आले.

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पावसाळा लागण्यास अवघा पंधरा दिवसाचा कालावधी राहिला असून खरीप हंगामातील पेरणी पुर्व  तालुक्यातील शेतकरी बांधवांना बि-बियाणांसह खत उपलब्ध करून देण्यात यावे तसेच कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवाना ज्या काही शेतकरी हिताच्या शासकीय योजना आहेत त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या तालुका कृषी विभागाला दनका दिल्या शिवाय राहणार नाही असा इशारा देखील प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.

सदरील निवेदन देते वेळेस तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के शहरप्रमुख माउली वाघमारे युवाआघाडी  तालुकाप्रमुख नरेश जोगदंड मंचक कुऱ्हे,श्रीहरी इंगोले, मोतिराम भोसले,सुरेश वाघमारे आदींची प्रमुख उपस्थीती होती.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या