💥इंडियन रिपोर्ट्स असोसिएशनचे महासचिव मो.जहांगीर यांच्या वाढदिवसानिमित्त 'निवारा' मधील बेवारसांना फल व अल्पोपहार...!


💥आपुलकीच्या भावनेने मायेने दिलेल्या या भेटीने 'निवारा' मधील लाभार्थी गहिवरून गेले💥 


परभणी - संपूर्ण भारत देशात सर्वाधिक पत्रकार सभासद संख्या असलेल्या इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नविदिल्ली या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव मो.जहांगीर,६डान ब्लाॅक बेल्ट (यु.एस.ए. ), फेडरेशन ऑफ शेटोकान कराटे ट्रेडीशनल इंडिया (F.S.K.T.I.)चे भारतीय प्रतिनिधी अध्यक्ष, वर्ल्ड गेम असोसिएशन (I.W.G.A.)सदस्य, यांचा दि.५ मे रोजी वाढदिवस देशात सर्वत्र साजरा केल्या जातो, आपल्या महाराष्ट्रात ही इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन (इ रा) च्या परभणी जिल्हा शाखेतर्फे मान्यवर मो.जहांगीर सर यांचा वाढदिवस येथील,बेघर व अनाथांना सहारा दिलेल्या ' निवारा ' या केंद्रातील गरजु स्त्री, पुरूषांना फळ व अल्पोपहार वाटप करुन साजरा करण्यात आला.आपुलकीच्या भावनेने, मायेने दिलेल्या या भेटीने 'निवारा'मधील लाभार्थी गहिवरून गेले होते.


इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन चे परभणी जिल्हा अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार मदन कोल्हे, मिडिया चिफ देवानंद वाकळे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धायजे, परभणी महानगर शहराध्यक्ष मयुर मोरे देशमुख,सारीपुत्र वाकळे यांची उपस्थिती लाभली होती.'निवारा'चे व्यवस्थापनाने 'इरा' च्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या