💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाच्या हेडलाईन्स......!


💥गुप्तचर विभागाचा अलर्ट; परराज्यातील लोक महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात ; महाराष्ट्र पोलिस सतर्क💥

 ✍️ मोहन चौकेकर

*राज्यात मंगळवारी 182 रुग्णांची नोंद तर 170  रुग्ण कोरोनामुक्त,देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मृत्यूही घटले ; गेल्या 24 तासांत 2568 नवे रुग्ण 

*2008 मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी सांगलीमधील शिराळा कोर्टाकडून  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

*कोल्हापुरात 6 मे रोजी शाहू स्मृती शताब्दीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार - संभाजीराजे छत्रपती

*मुंबईतील आर्थर रोड कारागृहात बंद असलेले मंत्री नवाब* मलिक यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आलंय 

*पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले ; त्याच्याकडून 11 लाख 80 हजार रुपयांचे 118 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त

*अ‍ॅमेझॉनविरोधात मुंबईच्या वांद्रेत गुन्हा दाखल ; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री केल्याचं उघड झाल्याने कारवाई

*कुणाच्या अल्टिमेटवरवर राज्य चालत नाही,हिंदु ओवेसींना सुपारी देऊन वातावरण बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न - संजय राऊत 

*परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ भाजप नेत्यांकडून व्हायरल; 

*रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या भंडाऱ्यातील महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं,जादूटोणा केल्याच्या संशयातून हत्या

*ईद मुबारक देशभरात नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा,अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याची ईद

*राजस्थानच्या जोधपूरमध्ये जालोरी गेटवर ध्वज आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक ; अनिश्चित काळासाठी इंटरनेट सेवा बंद 

*अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल,औरंगादमधील सिटी चौक पोलिसांत गुन्ह्याची नोंद

*महाराष्ट्रात जाती-जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू - श्रीमंत कोकाटेंचा आरोप

*कुणाच्या अल्टिमेटवर राज्य चालत नाही, हिंदु ओवेसींना सुपारी देऊन वातावरण बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न - संजय राऊत

*राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले 

*भोंगे बळजबरीने काढले जात असतील तर रिपाइंचे कार्यकर्ते मशिदीला संरक्षण देतील : रामदास आठवले

*पुण्याच्या हर्षदा गरुडची सुवर्ण कामगिरी, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

*केंद्राच्या वित्त मंत्रालय अंतर्गत सयुक्त हिंदी सल्लागार समितीच्या सदस्यपदी हिंगोलीच्या प्रा. डॉ. वसंत गाडे यांची नियुक्ती

*ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळ ; जोधपूरमध्ये १२ तासांत ३ वेळा हिंसाचार; अनंतनागमध्ये दगडफेक, खरगोनमध्ये कर्फ्यू

*खुशखबर! भारतीय टपाल विभागात ३८,९२६ जागांसाठी भरती ; १० वी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी

*जगद्गुरु परमहंसाचार्य कोठडीत:पोलिसांनी अज्ञात स्थळी हलवले ; भगवी वस्त्रे घालून ताजमलाहात जाण्याचा होता प्रयत्न

*गुप्तचर विभागाचा अलर्ट; परराज्यातील लोक महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात,‘पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द पोलीस महासंचालकांची माहिती

*विदर्भात वातावरण ढगाळलेलं ; अमरावतीत पावसाच्या सरी कोसळल्या! उद्याही विदर्भात आकाश ढगाळलेलं राहणार असून, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 

*राजकारणात उतरायचं हे आता निश्चित, पुढील भूमिका 6 मे नंतर जाहीर करणार, संभाजीराजे छत्रपती यांनी केलं स्पष्ट, राज्यसभेचा कार्यकाळ आज संपला 

*रवी राणांच्या खारमधील फ्लॅटवर मुंबई महापालिकेची नोटीस, अवैध बांधकाम केल्याचा आरोप ; फ्लॅटमधील अवैध बांधकामाची उद्या पाहणी

*मुंबईतील आर्थर रोड कारागृहात बंद असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक;* जे.जे. रुग्णालयातील ICU मध्ये दाखल ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या