💥भारतीय जनता पक्षाच्या परभणी जिल्हा चिटणीस माधवीताई घोडके यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती💥

परभणी - आज भारतीय जनता पक्षाच्या परभणी जिल्हा चिटणीस व माजी राज्य कार्यकारणी सदस्य भारतीय जनता पार्टी ओ बि सी महिला आघाडी च्या श्रीमती माधवीताई घोडके यांनी ५० महिलांसह प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेश सोहळा प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी जिल्हा संपर्क कार्यालयात पार पडला.

या वेळी श्रीमती माधवीताई घोडके यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती चे पत्र जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते देण्यात आले श्रीमती माधवीताई घोडके यांना देण्यात आले मा.ना. बच्चुभाऊ कडू यांचे विचार जिल्ह्यातील तळागाळातील सामान्य नागरिक व गरजवंता पर्यंत पोहचविण्याचे काम भविष्यात महिला आघाडीच्या माध्यमातून करण्याचा निर्धार यावेळी श्रीमती माधवीताई घोडके यांनी व्यक्त केला.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, विष्णू गोल्डे, रमेश काळे, शिल्पाताई वाव्हळे, निर्मलाताई धोत्रे, अंजलीताई उबाळे, स्वातीताई बनसोडे, गीताताई चोटालीया, उषाताई पातूरकर, वीणाताई वानरे इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या