💥पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी...!


💥यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥

पूर्णा (दि.०३ मे २०२२) - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयांमध्ये भारत देशात पहिल्यांदाच अनुभव मंडपाच्या व्दारे समतावादी न्याय व्यवस्था निर्माण करणारे, सामाजिक व धार्मिक क्रांतीचे प्रणेते तथा लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची ९१७ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील  कर्मचारी यादव कल्लाळीकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या