💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥यंदा देशात मान्सून सरासरीच्या ९८ टक्के राहणार ; २६ मे २०२२ रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार💥 

✍️ मोहन चौकेकर

*पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नाही ; पोलिसांच्या तपासातील प्राथमिक निष्कर्ष,रेल्वे स्टेशनवरील वाहतूकही आता सुरू

*शेतावर गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केले ; आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावानजीक घटना 

*मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील उधळे गावानजीक अपघात; चालकाचे नियंत्रण सुटून, मोटार रस्त्याच्या बाजूला उलटली, एका वृद्धाचा मृत्यू 

*दहशतवाद्यांनी पोलीस हवालदार रियाझ अहमद यांच्यावर गोळीबार ; रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू 

*सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठा बदल ; २४ कॅरेट सोने ७३१ रुपयांनी स्वस्त होऊन दर प्रति १० ग्रॅम ५०,३८७ रुपयांवर पोहोचला, चांदी प्रतिकिलो ५९,७९६ रुपयांवरून ५९,२०७ रुपयांवर 

*मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बदलापूर आणि भिवंडीमध्ये दोन कथित बनावट पनीर उत्पादन कंपनीचा पर्दाफाश ; या कंपनीतून २१३१ किलो उत्पादन जप्त, सात जणांना अटक 

*माहूरमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकीला कारने चिरडले ; मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

*अकोला जिल्ह्यातील मुलीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावास ; चार लाख दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे

*गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वझुर वाळू धक्क्यावरून अवैध वाळू उपसा करणारांविरोधात गुन्हे दाखल ; जवळपास ९८ वाळूमाफिया विरोधात गुन्हे, ३८ जणांना अटक 

*मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ भीषण अपघात ; अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू 

*यंदा देशात मान्सून सरासरीच्या ९८ टक्के राहणार ; २६ मे २०२२ रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार ; स्कायमेटने वर्तवला अंदाज 

*बारामती शहरामध्ये हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने दुसऱ्या वेटरचा खून केला ; घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या एक तासात आरोपीला केली अटक

*मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वीच आलं होतं धमकीचं पत्र ; राज्य सरकारकडून  राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

*जालन्यातील चांदईमध्ये संचारबंदी लागू ; सर्च ऑपरेशन जारी, सरपंचासह १८ जण अटकेत

*विठ्ठलभक्तांसाठी कडू बातमी...लाडूचा प्रसाद मिळण्यास आणखी विलंब होणार

*दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाबाबत गुप्तचर विभागानं केला मोठा खुलासा

*“आम्ही चोर, गुन्हेगार नाही”, बीडमध्ये निरपराध असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी कुटुंबाने घराला बसवले सीसीटीव्ही

*'आज रुग्णसंख्या वाढतेय पण ते फारसं भीतीदायक किंवा गंभीर नाहीये कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही'; असं राजेश टोपे म्हणाले

*“शिवाजी महाराजांचा अजेंडा हिंदुंचं…” महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजचं नवं विधान.... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या