💥पुर्णेत रेल्वेच्या माहेर घरी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ; दुसरी शाळा बंद करण्याचा घाट....!


💥या स्नेह मेळाव्यास सन 1975 या काळापासुन शिकुन गेलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय राहणार💥✍🏻विशेष वृत्त :- रमेश  गायकवाड 

पुर्णा : तब्बल शंभर वर्षाची परंपरा  असलेल्या रेल्वे शाळेची घंटा कायमस्वरुपी बंद  करण्याचा  घाट रैल्वे प्रशासनाने घातला असुन दुसरीकडे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दि.08 मार्च 2022 रोजी शहरातील सुमंन मंगल कार्याल्यात होऊ घातला आहे.या स्नेह मेळाव्यास सन 1975 या काळापासुन शिकुन गेलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय राहणार हे नक्कीच.हा सोहळा ना भुतो ना भविष्यतो व्हावा  म्हणून  उच्च  पदावर असलेल्या  पासुन  ते इतरही विघाथ्र्यानी पैसा गोळा करुन हा सोहळा घडऊन आणला आहे.पुर्णा शहर हे रेल्वेचे काचीगुडा ते मनमाड या मार्गावरील रेल्वेचे सन 1899 ते 1900 साली या भागात रेल्वेची मुहर्तमेढ रोवल्या गेली  प्रारंभी  हैद्राबाद  विभागात  समाविष्ट  होता. बिर्टीश राजवटीत  पुर्ण संपूर्ण  रैल्वे स्टेशनला  एक  पुलिंग पाॕइंट  म्हणून  नावारुपाला आले  येथे रेल्वेचे सर्व  विभागाचे कार्याल्य सुरु केली गेली  जवळपास दोनशे एकर जागेवर रेल्वे  कर्मचाऱ्यांना  निवासासाठी रेल्वे  काॕलनी  उदयाला आली साहजिकच  सर्व  भाषीक  एकञ वास्तव्य  करु लागले. कर्मचाऱ्यांच्या मुलाना  शिक्षण मिळावे या उदात हेतुने सन 1903 साली "एग्लो इंडियन प्रायमरी स्कुल " त्यामुळे मराठी  शाळे सोबत इंग्रजी  माध्यम व तेलगु माध्यम शाळा  सुरु करण्यात  आली  विघाथ्र्याची लक्षणीय संख्या  लक्षात घेऊन कनिष्ठ  महाविद्यालये  सुरु झाले.स्काऊट गाइडमध्ये वाखाण्याजोगी कामगीरी बजावली शिवाय  सांस्कृतिक .कला. क्रिडा  क्षेत्रात  उल्लेखनीय  कामगीरी बाजावली  कनिष्ठ  महाविद्यालयात  प्रयोग  शाळा. भव्य दिव्य ग्रंथाल्य आसल्याने बाहेरचे विघार्थीही शिकाय येऊ लागले  होते. असा आंसा एकंदरीत  कारभार चालत होता. किंबहुना  या शहराला दुष्ट  लागावी त्या प्रमाणे प्रांतवाद  चिघळला आपल्या कडच्या पुढाऱ्यांची ताकद तुटपुंजी पडली कि काय करोडो रुपयाची शैक्षणिक  सामुग्री  धुळीच्या खाईत पडली. 1986 साली या शाळेचे रुपांतर रेल्वे  मिक्सड  हायस्कुल असे नाव देण्यात आले शाळेतील  काही शाखा बंद  करण्याचा चंग बांधल्या गेला  हळूहळू  सर्व  शाळा बंद करण्याची  घोषणा 2022साली करण्यात आली आहे. या रेल्वे  प्रशासनाचा डाव यशस्वी  ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.पुर्णेच्या मातीतुन रेल्वे  शाळेतुन विदेशात व  देशाच्या  कानाकोपरात उच्च  पदावर हुद्दावर असलेल्याचा हा शहरात  मेळावा भरत आहे.कित्येक  वर्षाच्या  तपानंतर वर्गातील बाल मिञाला मैञिनीना भेटण्याची ओढ प्रत्येकाच्या मनाला लागली असावी.या मेळाव्यातुन परत जाताना हि शाळा पुन्हा  नव्वा दमाने ऊभी राहील काय याकडे सर्वानी ताकद एकवटावी व रेल्वेचे माहेर घर म्हणून  मराठठ्यात सुपरिचित होत आसलेल्या शहराला गत वैभव प्राप्त  होईल हा अनुतरीत प्रश्न  वाटतो.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या