💥मान्सूनपूर्व नाले सफाई तात्काळ सुरु करा अन्यथा नाल्यातील कचरा मनपा कार्यालयात टाकू...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाचा निवेदनाद्वारे इशारा💥


परभणी - मान्सुन आवघ्या १० दिवसावर येऊन ठेपला असतानाही परभणी शहर महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत असून अद्यापही परभणी शहरातील मुख्य नाले व इतर नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. दर वर्षी ही नाले सफाई मे महिन्या पहिल्या आठवडयामध्ये सुरु होऊन मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडयापर्यंत संपते परंतु या वर्षी मे महिना संपत आला तरी ही परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने अद्यापही शहराची नाले सफाई झालेली नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे.


परभणी शहरातील नाल्यांची आवस्था इतकी बिकट झाली आहे की थोडा देखील पाऊस पडला तर नाल्यातील पाणी रस्त्यांवर वाहू लागते मागील वर्षी नाले सफाई व्यवस्थीत न झाल्यानेच परभणी शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. आज रोजी शहरातील सर्वच प्रमुख नाल्यांमध्ये पाच फुटापर्यंत झाडे व वेली उवगवली असून प्लास्टिक व इतर कचऱ्यानी नाले तुडुंब भरून गेलेले आहेत अश्या अवस्थेत शहरात एखादा मोठा पाऊस झाला तर शहराला गटाराचे स्वरूप येईल.

मागील वर्षी तुंबलेल्या नाल्या व वस्त्यात शिरलेले पाणी या घटनांमधून परभणी शहर महानगरपालिका प्रशासन कुठलाच धडा घेणार नसेल व वारंवार विनंत्या करुनही शहरातील नाली सफाई होत नाही. परभणी शहर महानगरपालिका आपली जबाबदारी पार पाडत नाही म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख या नात्याने परभणी शहर महानगरपालिका प्रशासनास तात्काळ सूचना देऊन शहरातील नाले सफाई तात्काळ सुरु करावी अशी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आले आहे.

परभणी शहर महानगरपालिका प्रशासन शहरातील नाले सफाई करण्यास दिरंगाई करणार असेल तर प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने शहरातील नाल्यांमधील गाळ काढून तो गाळ परभणी शहर महानगरपालिका कार्यालयात आणून टाकला जाईल व यावेळी उदभवणाऱ्या कायदा व सुव्यस्थेच्या बाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नासाठी आयुक्त, परभणी शहर महानगरपालिका जबाबदार असतील असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर चिटणीस वैभव संघई,सर्कल प्रमुख श्याम भोंग,धर्मेंद्र तूपसमिद्रे,शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या