💥मुख्याधिकारी अजय नरळे ठरताय बेजवाबदार अधिकारी : सहआयुक्तांच्या आदेशालाही दाखवली केराची टोपली💥
पुर्णा नगर परिषदेतील बेबंदशाही कारभाराला प्रशासक पदावर सुधीर पाटील यांची नियुक्ती केल्यानंतर तरी अंकूश लागेल व नगर परिषदेतील कारभार सुधारेल अशी अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त केली जात होती परंतु प्रशासक म्हणून पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर मात्र नगर परिषदेत अभुतपुर्व गोंधळाला सुरूवात होऊन नगर परिषद प्रशासनाचा संपूर्ण कारभारच निरंकूश झाल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषदेतील आस्थापणा विभाग,स्वच्छता विभाग,आरोग्य विभाग,बांधकाम विभागासह सर्वच विभागांमध्ये घोटाळ्यांच्या मालिकांनाच जनू सुरूवात झाल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा नगर परिषद घोटाळ्यांमुळे सातत्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असते कारण जाणीवपूर्वक घोटाळ्यांसह आर्थिक भ्रष्टाचार करून देखील वरिष्ठ अधिकारी आपणास वाचवतातच असा दृढविश्वास नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांना झाल्यामुळे त्यांची हिंमत कमालीची वाढल्याचे निदर्शनास येत आहे राज्यात सर्वत्र नौकर भरती प्रक्रिया बंद असतांना मात्र येथील प्रशासकीय अधिकारी सय्यद इमरान सय्यद अशफाक या भ्रष्ट अधिकाऱ्यांने भरती घोटाळा करून मागील सहा महिण्याच्या कालावधीत चक्क तिन ते चार कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती करून अकलेचे तारे तोडल्याचे निदर्शनास येत असून सदरील नौकर भरती कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशाने करण्यात आली या नौकर भरती संदर्भात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,जिल्हा नगर परिषद प्रशासन विभागाचे आयुक्त/सहआयुक्त यांची मान्यता घेतली काय ? या भरती संदर्भात नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पास करण्यात आला आहे का ? असे एक नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित होत असून या आदेशावर तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी नितेशकुमार बोलेलो,प्रशासक सुधीर पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत की नगर परिषदेच्या परंपरे नुसार या आदेशावर देखील बोगस स्वाक्षरी मारण्यात आली आहे याची सुध्दा चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
एकंदर पुर्णा नगर परिषदेवर शासनाकडून प्रशासक म्हणून सुधीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर नगर परिषदेचा कारभार सैरभर झाल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे जनसामान्यांची कुचंबना होत असून नगर परिषदेतील घोटाळ्यांच्या चौकशी संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किती ही आदेश काढले तरी त्या आदेशाला कचराकुंडी कशी दाखवायची यांचा संपूर्ण अभ्यासच जनू नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांना आल्याने गेंड्याच्या कातडी प्रमाणे निब्बरगट्ट झालेले अधिकारी/कर्मचारी आपला गैरकारभार अत्यंत सुरळीतपणे चालवतांना दिसत असून नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता संजय दिपके यांनी शहरात सर्वत्र बोगस बांधकाम सिमेट रस्ते तसेच नाल्यांची काम पारपाडून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी सुरळीपणे जिरवण्याचे काम केले पुर्वी झालेल्या सिमेंट रस्ते/नाल्यांच्या नावांमध्ये बदल करून रस्त्यांवर रस्ते नाल्यांवर नाल्या पुर्वीच्या सांस्कृतिक सभागृहांची थातूरमातूर दुरूस्तीच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी चोरांच्या घश्यात घालण्याचे काम कनिष्ठ अभियंता दिपके यांनी केले असल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हा नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्तांनी त्यांच्या चौकशीचे आदेश जारी केले परंतु त्यांच्या आदेशाला देखील प्रशासक/मुख्याधिकारी यांनी कचराकुंडी दाखवल्याचे दिसते......
0 टिप्पण्या