💥राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदी दत्ता काळे तर मुख्य सचिव पदी उद्धव पाळवदे यांची निवड...!


💥ही निवडणुक लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन करण्यात आली💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर येथील आरोग्य कर्मचारी यांची  राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदी जिंतूर चे  श्री दत्ता काळे तर मुख्य सचिव पदी श्री उद्धव पाळवदे (गंगाखेड) यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवडणुक लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन करण्यात आली.

 उर्वरित जिल्हा कार्यकारणी खालील प्रमाणे :-

अध्यक्ष- श्री दत्ता काळे( जिंतूर), उपाध्यक्ष श्री सुभाष फुलवरे (मानवत), विजय मोरे (जिंतूर ),सरचिटणीस उद्धव पाळवदे (गंगाखेड), सहचिटणीस माधव माटे ( गंगाखेड), कार्याध्यक्ष दिलीप लिपणे (परभणी), कोषाध्यक्ष राम मोरे(सेलु), संघटक सुधाकर कणसे(सोनपेठ), संतोष कांदे (पाथरी), हरिदास शिंदे( पूर्णा ),जिल्हा समन्वयक गजानन राठोड( सोनपेठ), तर प्रसिद्धीप्रमुख मनोज डाके जिंतूर आदी कार्यकारणी जाहिर करण्यात केली असून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या