💥नांदेड सचखंड गुरूद्वारा बोर्डाचा कार्यकाळ संपल्या मुळे बोर्ड बरखास्त करून तात्काळ निवडणूक घेण्यासाठी आंदोलन...!


💥जिल्हाधिकारी कार्यालया समोर बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिख बांधवांकडून साखळी उपोषणास सुरू💥

नांदेड (दि.२३ मे २०२२) - येथील सचखंड गुरूद्वारा बोर्डाचा कार्यकाळ संपला असून गुरूद्वारा बोर्ड तात्काळ बरखास्त करून निवडणूक घेण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज सोमवार दि.२३ मे २०२२ रोजी सकाळच्या सुमारास बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिख बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की यापुर्वीच्या भाजप शासनाने केलेल्या कलम ११ चे संशोधन रद्द करण्यात यावे, गुरुद्वारा बोर्डाच्या तीन वर्षाचा कार्यकाळा मध्ये करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी,नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्या ऐवजी ११ सदस्यांची निवडणूक घेण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज सोमवार दि.२३ मे पासुन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय समोर बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली असून आज प्रारंभ झालेल्या साखळी उपोषणातउ पोषणकर्ते म्हणून स.बंदीछोडसिंघ खालसा,स.खुशालसिंघ कोटतिरथवाले. हे उपोषणास बसले आहेत. 

त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष स. मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी स.बिरेंदरसिंघ बेदी, स. जसपालसिंघ लांगरी , स.बंदीछोडसिंघ खालसा, स. प्रेमजितसिंघ शिलेदार. माता साहेब चे बाबा गुलाबसींघ जी स.नरेन्द्र सिंघ ग्रंथी, गुरुद्वारा बोर्ड सदस्य स.गुरमीत सिंघ महाजन, मनप्रीतसिंघ कुंजीवालेमा उपाध्यक्ष स.इंदरजीत सिंघ गल्लीवाले, स.मोहन सिंघ गाड़ीवाले, स.गुरमीतसिंघ बेदी स.अवतारसिंघ पहरेदार,स.राजेंद्र सिंघ पुजारी,स.नरेन्द्र सिंघ लिखारी स.रणजीतसिंघ गिल, स.प्रितपाल सिंघ शाहू, स.तेगा सिंघ बावरी, स.हरभजनसिंघ पुजारी,स.जसबीर सिंघ बुगंई, स.जसबीरसिंघ हंडी, स.देवेंद्रसिंघ महाजन, स.गजेन्द्रसिंघ शाहू , स.विक्रमवीरसिंघ हुंदल, स.गुरप्रितसिंघ शिलेदार, स.गुब्बीसिंघ कुलफीवाले,स.सोनुसिंघ खालसा आदींची विशेष उपस्थिती आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या