💥हिंगोलीत पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने बेपत्ता मुलगी पालकांच्या स्वाधीन मुलीला पाहताच वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू....!


💥वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी रुपेश धाबे यांचे कौतुकास्पद कार्य💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

अंबिका टाकीज रस्त्यावर सापडलेल्या मुलीस पोलिसांनी व्हाट्सअप संदेश द्वारे आपल्या आई वडीलास मिळविले वाहतूक शाखेचे रुपेश धाबे यांचे कौतुकास्पद कार्य 


          सद्यस्थितीत जींकडे तिकडे जो तो आपापल्या कार्यात गुंग असतो कुणी कुणाला आपला वेळ देण्यास सुद्धा या दगदगीच्या जीवनात व्यस्त असतो परंतु हिंगोली येथील कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस रुपेश धाबे यांनी अंबिका टॉकीज समोर आज दिनांक २५ रोजी सापडलेल्या मुलीला आजच्या आज व्हाट्सअप संदेश द्वारे आई-वडील मिळवून देऊन आपल्यातील माणुसकीच्या वर्दीतील चुणूक दाखवून दिली आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      दिनांक २५/५/२२ रोजी सकाळी ११.०० वाजता अंबिका टॉकीज रोडवर एक दीड ते दोन वर्षाचे लहान मुलगी जिला बोलता येत नाही अशी मुलगी रस्त्यावर मिळून आल्याने सदर ठिकाणी त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता कोणीही मिळून न आल्याने सदर मुलीला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी  गांधी चौक येथे घेऊन आले व त्या ठिकाणी देखील विचारपूस केली तसेच पोलीस स्टेशनला कळविले तरी देखील त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध लागत नव्हता. त्यानंतर  त्या मुलीचा फोटो काढून व्हाट्सअप ग्रुप वर वायरल केला तेव्हा सदरची मुलगी लोहगाव येथील असल्याचे समजले.आम्ही लोकांना विचारपूस करून त्या मुलीचे नाव श्रावणी संतोष महाजन असे कळल्याने आम्ही तिच्या वडीलास फोनद्वारे माहिती देऊन गांधी चौक येथे येण्यास सांगितले तेव्हा संतोष महाजन हे गांधी चौक येथे आमच्या समोर आल्यानंतर आम्ही त्या मुलीचे ओळख पटवून तिला १२.३०  वा. वडिलांचे सपूर्द केले . हिंगोली वाहतूक शाखेतील पोलिसांनी केलेल्या या कार्यास सलाम.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या