💥हिंगोली ते सेनगाव महामार्गावर ब्रम्हपुरी पाटीजवळ कार ऑटोचा भीषण अपघात ऑटो मधील दोघे जागीच ठार...!


💥या भिषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रम्हपुरी पाटी जवळ ऑटो अपघातात ऑटो मधील दोघे जागीच ठार जाल्याची घटना आज दि 21/05&2022 रोजी सकाळी 10.30 मिनिटांनी घडली आहे अंकुश साहेबराव साबळे व अनुराधा अंकुश साबळे रा .लिंबाळा.तांडा अशी मृत व्यक्तीचे नावे आहेत 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडि येथील अंकुश साबळे व त्याची पत्नी अनुराधा साबळे हें दोघेजन ऑटोने आज सकाळी हिंगोली कडे कडे जात होते त्याचा ऑटो हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रम्हपुरी पाटी जवळ आला असतांना अंकुश साबळे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याचा ऑटो समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळला त्यानंतर ऑटो रस्त्यावर उलटला या अपघातात या अपघातामधे अंकुश व अनुराधा या दोघाचा जागेवर मृत्यू झाला आहे तर हिंगोली येथून सेनगावकडे जाणारे कार मधील सेनगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुभाष चव्हाण हें देखिल जखमी झाले आहेत

अपघाताची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागरे .सहाय्यक उपनिरीक्षक आर .बि .पोटे ..जमादार .पि .जी .डवले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी दोन्ही मयतांना उत्तरिय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे या प्रकरणात अद्याप पर्यन्त नरसी नामदेव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही 

हिंगोली ते सेनगाव या मार्गावर गेल्या तीन दिवसा पासून रोजच अपघात घडत आहेत दि 16/05/2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास कार आणि मोटरसायकल अपघात झाला या मधे मोटरसायकल वरील दोघे जन जागीच ठार झाले होते आणि दि 20/05/2022 रोजी सकाळी 8 च्या सुमारास कार आणि टेम्पो चा भीषण अपघात झाला यात कार मधील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या कार मधील व्यक्तीला जे सी पि च्या सहाय्याने कारचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले होते आणि आज कार ऑटो अपघातात दोघे जन ठार झाले आहेत या रोडवर अपघातचे प्रमाण वाढले आहे दि 18/05/2022 रोजी देखिल सेनगाव तालुक्यातील बाभूलगावजवळ दोन दुचाकीची समोरा समोरा धडक झाली या मधे एक जन जागीच ठार झाले होते तर तिघे जन गंभीर जखमी झाले होते .गेल्या चार दिवसात 6 जणांचा जीव अपघातमुळे गेले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या