💥सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांना पञकारीतेचा राज्यस्तरीय 'अभिमान पुरस्कार' ....!


💥२६ मे रोजी अहमदनगर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान💥

✍🏻फुलचंद भगत : मंगरुळपीर

मंगरुळपीर:-मंगरुळपीर येथील पंचक्रोशीत नावलौकीक असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांना यंदाचा पञकारीतेचा राज्यस्तरीय 'अभिमान पुरस्कार मिळाला आहे.त्यांनी पञकारीता क्षेञात महाराष्टाची आघाडीची वृत्तवाहिनी एन टीव्ही न्युज मराठी च्या माध्यमातुन सामाजीक, शैक्षणिक,राजकिय,क्रिडा अशा विविध क्षेञात जनजागृतीपर आणी ऊल्लेखनिय कार्याचा म्हणून दि.२६ मे २०२२ रोजी एन टिव्ही न्युज वृत्तवाहीणीच्या २० व्या वर्धापनदिनी मुख्य संपादक ईकबाल सर,लोकप्रिय आमदार निलेश लंके,अहमदनगरचे आमदार सग्रामभैया जगताप,जेष्ठ पञकार नंदकुमार सातपुते,कोठारी फाऊंडेशनचे श्री.कोठारी साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते यंदाचा राज्यस्तरिय 'अभिमान पुरस्कार'देण्यात आला आहे.

          सदैव सामाजिक कार्याची कास धरुन तळागाळातील लोकांसाठी समाजपयोगी कार्य करणारे तसेच पञकारीतेच्या माध्यमातुन विविध क्षेञात ऊल्लेखनिय कार्य करुन जनमानसात ठसा ऊमटवणारे युवा पञकार फुलचंद भगत यांना विविध स्तरातुन याआधीही गौरवण्यात आले असुन त्यांना सामाजीक कार्य  आणी ऊत्कृष्ट पञकारेतेसाठी राज्यस्तरीय 'पञकार भुषण' पुरस्कारही मिळाला आहे.यासोबतच विविध क्षेञातील ऊल्लेखनिय कार्याबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.फुलचंद भगत यांनी निराधार बालकांना मदत मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेवुन जिल्ह्यातील निराधारांच्या समस्या शासनदरबारी मांडुन अनेकांना न्याय मिळवुन दिला आहे.कोरोनाकाळात विविध सामाजीक ऊपक्रमाच्या माध्यमातुन लोकहिताचे काम करुन गोरगरीबांना मदत केली.अल्पकाळात पञकारीता क्षेञामध्ये आपले नावलौकीक करत अनेक समस्यांना वाचा फोडली आणी शासनदरबारी न्याय मिळवुन दिला.सामाजीक,राजकीय,क्रीया,शैक्षणिक,सास्कृतिक,निसर्ग पर्यावरणाविषयी ऊल्लेखनिय कार्य आणी लिखान तसेच लोकोपयोगी अशा विविध क्षेञात स्वतः पुढाकार घेवुन तसेच बातमीदारीतुनही आपली चुणुक दाखवुन ऊल्लेखनिय कार्य केले.सतत गरीबांच्या प्रश्नासाठी काम करणार्‍या आणी पञकारीतेतुन समाजहितासाठी झटणार्‍या युवा पञकार फुलचंद भगत यांना यंदाही एन टीव्ही वृत्तवाहीनीकडुन 'अभिमान' पुरस्काराने गौरविन्यात आले आहे.दि.२६ मे २०२२ रोजी एन टीव्हिच्या २० व्या वर्धापनदिनाचा अहमदनगर येथील पंचतारांकित हाॅटेल व्हि स्टार येथे अभुतपुर्ण सोहळा आयोजीत करण्यात आला होता.या सोहळ्यामध्ये एनटीव्हीचे मुख्य संपादक इकबाल शेख,आमदार सग्रामभैया जगताप,लोकप्रीय आमदार निलेश लंके तथा मान्यवरांच्या प्रमुख ऊपस्थीतीत यंदाचा राज्यस्तरीय 'अभिमान पुरस्कार'देवुन भगत यांना गौरविन्यात आले आहे.फुलचंद भगत यांचे पञकारीता आणी सामाजीक क्षेञातील ऊल्लेखनिय कार्य बघता प्रशासकीय तसेच सर्व स्तरातुन नेहमी कौतुक होत असते.यंदाचा त्यांना'अभिमान पुरस्कार' मिळाल्याची  बातमी कळताच त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पञकारीतेचा राज्यस्तरीय अभिमान पुरस्कार मिळाल्याने समाजातील तळागाळातील शोषीत आणी गरजु लोकांसाठी काम करण्यासाठी मला नवी प्रेरणा आणी ऊत्साह मिळाला.युवा वर्गांनी आपल्या शक्ती आणी बुध्दीचा वापर समाजहितासाठी व विधायक कार्यासाठी वापर करावा जेणेकरुन आपण इतरांची प्रेरणा बनू असे आवाहनही याप्रसंगी फुलचंद भगत यांनी केले आहे.चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासुन करा म्हणजे इतर लोक प्रेरणा घेवून या समाजपयोगी ऊपक्रमात सहभागी होतील असे भगत यांनी मत व्यक्त केले.....

✍🏻फुलचंद भगत : मंगरुळपीर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या