💥गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील महाविकास आघाडीस खिंडार....!

💥आघाडीचे प्रमुख नेते भगवानराव सातपुते रासपात दाखल💥


गंगाखेड : तालुक्यातील इसाद येथे आज रोजी सातपुते गल्लीत गोसावी मारुती मंदिरात रासपा चा पक्ष प्रवेश सोहळा आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब* यांच्या हस्ते पार पडला या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते माजी सरपंच भगवानराव सातपुते व भाऊसाहेब मालीपाटील भुजंगराव सातपुते ग्रामपंचायत सदस्य मारुती भगवानराव सातपुते मधुकरराव पोलीस पाटील यांचेसह जवळपास 40 ते 50 सातपुते गल्लीतील कार्यकर्त्यांनी रासपा मध्ये प्रवेश केला या कार्यक्रमास जि. प. सदस्य किशनराव भोसले प्रभारी हनुमंत मुंडे सरपंच उद्धवराव सातपुते व माजी उपसभापती रामप्रसाद सातपुते उपस्थित होते कार्यक्रमानंतर रामप्रसाद सातपुते कडून सर्वांनी भोजनाचा (पुरण पोळी) चा आस्वाद घेतला सध्या इसाद हे गाव संपूर्ण रासपामय झालेले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या