💥निम्न दुधना प्रकल्पावरील रखडलेली व देखभालीची कामे पाच जून पर्यंत पूर्ण होणार....!


💥अभियंता व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मटकऱ्हाळा येथील कामाची पाहणी💥

परभणी - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या जलसंपदा विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर हा अभिनव उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला जात असून तो सध्या अंतिम टप्प्यात आहे. यात परभणी जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कालवा, मध्यम कालवा, चारी व शेतचाऱ्यांची देखभाल, कालव्या लगतचे रस्त्यांची दुरुस्ती सह रखडलेल्या कामाचा पाठपूरावा करून मागील चार महिन्यांपासून हि कामे युद्ध पातळीवर पूर्ण केली जात आहेत.


याच उपक्रमा अंतर्गत आज माजलगाव कालवा क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद लांब व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निम्न दुधना प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या मटकऱ्हळा व वाडी दमई येथील कामाची पाहणी केली. देखभाल व दुरुस्ती ची सर्व कामे पावसाळया आधी महणजेच पाच जून पर्यंत पूर्ण केली जातील असे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले. कालव्यांची व शेतचाऱ्यांची देखभाल दुरुस्ती तसेच कालवा लगतचे रस्ते दुरुस्ती ची कामे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या परिसरातील मटकऱ्हळा, संबर, सावंगी खुर्द, साडेगाव, वाडी दमई, झरी, बोबडे टाकळी व पिंगळी कोथळा या गावठाणातील मोठ्या प्रमाणावरील शेतजमिनी बारमाही सिंचना खाली येणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मा.ना. बच्चूभाऊ कडू, कार्यकारी अभियंता श्री प्रसाद लांब व प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या पदाधिकाऱ्यांचे चे आभार मानले आहेत.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर चिटणीस वैभव संघई, मटकऱ्हळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, माउली मुंजाजीराव गरूड, संदीप राऊत, दतराव राऊत, किशनराव गरूड, बालासाहेब तरवटे, आत्माराम भागवतराव गरूड, कृष्णा गरूड, हनुमान जगन्नाथराव गरूड, विठल किशनराव गरूड, राजेश हरकळ, रामा देविदास गरूड इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या